चिंचपूर इजदे येथील मोबाईल टॉवर बंदमुळे मोबाईलधारक ञस्त ; रिचार्ज करूनही ग्राहकांना नाहक भुर्दंड !


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील जिओ व आयडिया-वोडाफोन कंपनीचे  ट्रान्समिशन टॉवर गेली काही दिवसांपासून अनेकदा वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे नागरिकांकडे मोबाईल हातात असून त्याचा काहीच उपयोग होत नाही. नेहमीच चालू बंद होत असलेले  मनोरा यावेळी दोन दिवस बंद झाले आहे. कंपनी अधिका-यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
जिओ चे वर्षभराचे,काहींचे महिन्याचे प्लॅन चे  रिचार्ज केले असल्याने त्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आडिया-व्होडाफोन च्या हि कंपनीच्या रेंज व्यवस्थित मिळत नाही. चिंचपुर इजदे,करोडी, कुत्तरवाडी सह परिसरात नेटवर्क मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिओ, व आयडिया कंपनीने त्वरित चिंचपुर इजदे येथील टॉवर सुरळीत करण्यासाठी लक्ष द्यावे अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
👉🏻संकलन- पत्रकार सोमराज बडे 📞९३७२२९५७५७

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!