संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर इजदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सुलेखनकार महेंद्र काकडे यांची सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा पार पडली.
काकडे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हाताचे व्यायाम,अक्षराचे अवयव,लेखणीची पकड मुळाक्षरे लेखन यांचे सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपूर इजदे, हनुमान वस्ती, डोळेवस्ती, देवळकरवस्ती या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा.सूर्यकांत काळोखे, ज्योती आधाट मॕडम, संदीप राठोड यांच्या प्रेरणेने ही कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक खेडकर, अंबादास खंडागळे महाराज, मुख्याध्यापक भास्कर दराडे सर, मुख्याध्यापिका कुसूम बडे मॕडम, श्रीमती गीता खेडकर मॕडम,मंगल खेडकर मॅडम, नम्रता सातपुते मॕडम, सुनील खेडकरसर,सचिन शिंदेसर, संतोष खेडकरसर, शहादेव खेडकर, शिवनाथ खेडकर, अशोक डमाळे, सोमनाथ राऊत उपस्थित होते.
अंबादास सोनपुरे सर आणि अशोक सांगळे सर या मुख्याध्यापकद्वयीचे कार्यशाळेस सहकार्य लाभले. यावेळी सचिन शिंदेसर यांचा अध्यापन सेवेची अकरा वर्षे पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.