संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- कोरोना काळामध्ये यात्रा महोत्सव साजरा करता आला नव्हता, त्यामुळे प्रथमच तब्बल दोन वर्षाच्या कालखंडांनंतर साजरा होणारा यात्रा उसत्वामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचपुर पांगुळ परिसरात श्री मलिक हे जागृत देवस्थान असून भाविकांची मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे. बाहेरगावी कामानिमित्त गेलेले व्यवसायीक, चाकरमानी, यात्रेसाठी मोठया संख्येने उपस्थित राहतात.
गुरुवारी यात्रेला श्री क्षेत्र पैठण व श्री क्षेत्र नागनाथ देवस्थान नागतळा या ठिकाणाहून पायी चालत आलेल्या कावडीकरांनी आणलेल्या पाण्याने देवाला अभिषेक घालून सुरवात झाली.
शुक्रवार राञी रोजी देवाचा छबीना मिरवणूक मंदिर प्रदिक्षणासाठी काढण्यात येणार आहे.
छबिना मिरवणुकीनंतर मनोरंजनासाठी गाण्याचा (ऑर्केस्ट्रा) कार्यक्रम रात्री ९ वाजता होणार आहे ,तर शनिवार रोजी कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित करण्यात आला असून यासाठी वेगवेगळ्या भागातून नामांकित मल्ल हजेरी लावणार आहेत.
✒️संकलन -पत्रकार सोमराज बडे