चिंचपुर पांगुळ येथील शालेय विद्यार्थ्यांची दिंडी उत्साहात

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू माऊली च्या नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी यावेळी दिंडीचे आकर्षण ठरले. या बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.


श्री वामनभाऊ विद्यालयतर्फे आयोजित दिंडीमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाळ मृदुंग व विठू नामांनी पालखी मार्ग निनादला. शिक्षक श्री घुले यांनी नियोजन केले. मुख्याध्यापक श्री नरोडे यांनी वारकरी संप्रदायाबद्दलची माहिती दिली.
गर्जेसर, दहिफळेसर , भालेरावसर, संजय उदमलेसर, दहिफळसर, बडेसर, शिक्षिका गर्जे आदी उपस्थित होते.
त्याच प्रमाणे जि. प.प्राथमिक शाळा चिंचपूर पांगुळ च्या शाळेची इ. पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. विठ्ठल रखुमाई च्या वेषातील विद्यार्थ्यांची पाद्यपूजा करून दिंडीची सुरुवात झाली. तुळशी, पताका व टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रममाण झालेले विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री सापते, शिक्षिका भंडारी ,सौ.सापते आदी उपस्थित होते. एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालयातर्फे आषाढी एकदशीचे औचित्य साधून प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती फेरी काढली. स्वच्छताविषयक प्रबोधन फलक, झाडे लावा झाडे वाचवा,प्लास्टिक हटावचा नारा देत दिंडी निघाली होती. दिंडीचे स्वागत माजी सरपंच तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे यांनी केले. मुख्याध्यापक श्री नरोडे, मुख्याध्यापक सापते, तसेच भगवान केदार,सोपान बडे,गणपत बडे,भागीनाथ बडे,सुमन वारे,आदींसह पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
👉🏻संकलन -पत्रकार सोमराज बडे
📞९३७२२९५७५७

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!