संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील चिंचपुर पांगुळ-मानेेवाडी ग्रामस्थांनी श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या सन २०२३रोजी होणाऱ्या जन्मोस्तवानिमित्ताने ‘अखंड हरिनाम सप्ताह’चे आयोजित केला आहे. नारळ घेण्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी पारगाव (ता.शिरूर ,जि.बीड) या ठिकाणी गेली होती. यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या हस्ते गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने नारळाचा स्वीकार केला आहे.
टाळ-मृदुगाच्या तालावर वाजत-गाजत गावच्या शिवापासून रामगड मंदिरापर्यंत कलश-धारी महिलांसह दिंडी काढून नारळ गावात आणले. संत श्री वामनभाऊ यांच्यावर असलेल्या अपार श्रद्धेपोटी या सप्ताहाचे नियोजन ग्रामस्थांनी नियोजन केले आहे.
यासाठी अंदाजे ७० ते ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचा सर्व खर्च हा लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे.
हरिनाम सप्ताह होईपर्यंत गावात या दरम्यान मांसाहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जुगार,दारू,गांजा, गुटखा-मावा इत्यादी व्यसने करण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.
यावेळी माजी सरपंच तथा अहमदनगर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष धनंजय बडे पा., विष्णू खाडे पा., जगन्नाथ बडे पा., पोपटराव बडे पा., पञकार सोमराज बडे पा., आनंद रधवे, डॉ राजेंद्र खेडकर, डॉ अशोक बडे, बन्सी गुरुजी, माउली मेरड, शिवाजी बडे पा,आजिनाथ बडे पा, विष्णू सकुंडे, धायतडक, सानप, कुटे, देविदास राजगुरू, नवनाथ खंडागळे, आर.के बडे पा, अशोक अबिलढगे, साहेबराव अबिलढगे, छबूराव साळवे, तुकाराम बडे, भाऊसाहेब रंधवे, गणेश बडे-पेंटर, के.के आव्हाड, रावसाहेब गीते, पप्पू साळवे, भगवान केदार, सूर्यभान बडे, गोविंद बडे, दशरथ बडे, विक्रम साखरे, दगडू बडे पा, पोपट बडे.पा, पंढरीनाथ साळुंके आदीसह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
✍संकलन-पत्रकार सोमराज बडे
मोबा-९३७२२९५७५७