संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील पूर्वभागातील चिंचपुर पांगुळ आणि परिसरात रविवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाला आहे.
जोगेवाडी ,चिंचपुर पांगुळ,ढाकनवाडी तसेच वडगाव, मानेवाडी,येथील ,ओढे,नाले खळखळून वाहू लागले आहेत. मागील वर्षी रोहिणी नक्षत्रात पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र यावर्षी मृग नक्षत्र संपण्याच्या मार्गावर आले असून जून महिना संपत आला तरी पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. परंतु आज झालेल्या पावसाने बळीराजा आनंदून गेला आहे. यावर्षी पावसा अभावी पेरणीस उशीर होत असल्याने पाऊस होतो की नाही ,या विवंचनेत शेतकरी वर्ग होता. परंतु असे असताना उशिरा का होईना,आज रोजी विजांच्या कडकडाटासह अतिशय दमदार पावसाने हजेरी लावली आहे. ओढे ,नाले, तुडूंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे परिसरातील सर्व शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करताना दिसत आहे.
👉🏻संकलन-पत्रकार सोमराज बडे