घोटाळे लपवण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन : ओवेसी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. आम्ही तुम्हाला शिक्षणात आरक्षण मागितले. आम्हाला आरक्षण का देत नाही. तुमची तोंडं बंद का आहेत? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. असे बोलतानाच किती जणांकडे खिशात पेन आहे. खिशात पेन ठेवायला शिका. तुम्हाला कलम जिवंत ठेवेल. तलवार नाही, असे ओवेसी म्हणाले.

दरम्यान, मुस्लीम आरक्षणासाठी आपली लढाई सुरू झाली असून मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी येत्या 11 डिसेंबर या दिवशी मुंबईत धडक मोर्चाची घोषणाही ओवेसी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एमआयएमला मत न देण्याचे आवाहन केले होते. आम्हाला मत न देण्याचे आवाहन करणे म्हणजे भाजपला मतदान करण्यासारखे आहे. शिवसेना-भाजपला फायदा होईल म्हणून आम्हाला मतदान न करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचा परिणाम देखील झाला. सोलापुरात काहींनी त्याला खरे समजले होते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवले. जेव्हा सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा हेच लोकं एकत्र आले. आपण सगळे एक आहोत, असे म्हणत हे लोक एकत्र आले, असा हल्लाही त्यांनी चढवला. शिवसेना सेक्युलर नाही. ते भाजपासारखेच जातीयवादी आहेत. पवार साहेब सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? राहुल गांधी सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? तुम्ही विसरलात का 1992 ला काय झाले? असा सवाल ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!