ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासात एनसीसी ची भूमिका महत्त्वाची : पद्मश्री पोपटराव पवार

👉अहमदनगर येथे एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर:-
ग्रामीण भागातील पाणी प्रश्न, जमिनीचा प्रश्न , प्रदूषण समस्या, दुष्काळाची समस्या तसेच ग्रामसुरक्षा विषयी चे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेना महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी प्रतिपादन केले.

बी.टी.आर. अहमदनगर येथे झालेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कमांडंट लेफ्टनंट कर्नल नरेन दास, कॅम्प डेप्युटी कमांडंट रमेश सिंग, कॅम्प ॲडज्युटंट लेफ्ट. महादेव जाधव ,कॅप्टन प्राजक्ता भंडारी ,कॅप्टन गौतम केळकर, चीफ ऑफिसर भाऊसाहेब शिंदे, लेफ्टनंट नारायण गोरे ,लेफ्टनंट शांता गडगे ,फर्स्ट ऑफिसर बीबी गांगुर्डे, एस ओ अशोक कामटे उपस्थित होते .


पवार पुढे ते म्हणाले की ,ग्रामीण भागातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. समृद्ध खेडे बनवण्यासाठी एनसीसीचे विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली एकता ,शिस्त तसेच त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये घेतलेला उत्स्फूर्त सहभाग यामुळे ते ग्रामीण भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी पुढे येऊन खूप मोठ्या प्रमाणावर काम करू शकतात .कारण भारतातील युवकांचे सर्वात मोठे संघटन म्हणून राष्ट्रीय छात्र सेना कडे पाहिले जाते. एन सी सी चे माजी विद्यार्थी आणि एनसीसीचे कॅडेट मिळून हिवरेबाजार सारखे अनेक हिवरेबाजार महाराष्ट्रात निर्माण करू शकतात. असे ग्रामीण विकासाच्या मजबुतीकरणासाठी महत्त्वाचे विचार पोपटराव पवार यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी के जे सोमय्या महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. मोरे यांनी धार्मिक सहिष्णुता आणि जातीय सलोखा या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी एनसीसीच्या माजी कॅडेट्स चा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर चे विविध महाविद्यालयातील माजी एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते . त्यांनी मनोगता मधून राष्ट्रीय छात्र सेने मुळे आपल्या जीवनात झालेले बदल याबाबत अनुभव कथन केले . सद्यपरिस्थितीत राष्ट्रीय छात्र सेनेची भूमिका काय आहे हे त्यांनी विशद केले . यावेळी उपस्थित कॅडेटस नी कॅम्प कमांडंट लेफ्टनंट कर्नल नरेन दास यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कॅम्प मधील सहभागी एनसीसी कॅडेट्सनी महाराष्ट्रातील विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले.
कॅम्प कमांडंट लेफ्टनंट कर्नल नरेन दास यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात कॅम्प कमांडंट लेफ्टनंट कर्नल नरेन दास, कॅम्प डेप्युटी कमांडंट रमेश सिंग, कॅम्प ॲडज्युटंट लेफ्ट. महादेव जाधव ,कॅप्टन प्राजक्ता भंडारी ,कॅप्टन गौतम केळकर, चीफ ऑफिसर भाऊसाहेब शिंदे, लेफ्टनंट नारायण गोरे ,लेफ्टनंट शांता गडगे ,फर्स्ट ऑफिसर बीबी गांगुर्डे, एस ओ अशोक कामटे ,टी ओ अमोल दहातोंडे , CTO पवार , CTO पाटील, सुभेदार शहाजी जाधव, नंदन सिंग, दीपक कांबळे नायब सुभेदार सुखविंदर सिंग, बी एच एम राजेश कुमार, सीएचएम चंद्रमोहन, शिशुपाल सिंग, दिनेश सिंग हवालदार जितू सिंग सुरेंद्र सिंग प्रवीण देवतकर, वेताळ सिंह, तसेच कार्यालयीन कर्मचारी शंकर मेणा, सोनार, गणेश वामन, विष्णू शिंदे प्रतीक शिंदे आदी उपस्थित होते . या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात विविध महाविद्यालयातील एकूण 450 एनसीसी कॅरेट मी सक्रिय सहभाग घेतला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!