गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल ; पडळकर काय म्हणाले ते पहा…

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ

👉मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता.
👉आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय.
👉बँकेची निवडणूक घोषीत केलीये आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय
👉साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही.
👉१९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली.
👉 आणि सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये वसूल केले.
👉त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली ५०० रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम
👉अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केले.
👉त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या.
👉पण ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होतो.
👉त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही.
👉जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती.
👉अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!