गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ७ कोटी ३ लाख ५७ हजार रु. देणगी प्राप्‍त

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
Maharashtra (Shirdi) –
शिर्डी साईबाबा संस्‍थानला दि.२ ते दि. ४ जुलै या गुरु पौर्णिमा उत्सव काळात ७ कोटी ३ लाख ५७ हजार २४८ रुपये इतकी देणगी प्राप्‍त झाली, असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली .
यामध्‍ये रोख स्‍वरुपात रुपये २ कोटी ८५ लाख ४६ हजार ८८२ दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली असून, देणगी काऊंटर १ कोटी १५ लाख ८४ हजार १५० रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षी पेक्षा यावर्षी सुमारे तीन कोटी रुपये देणगी संस्थांनला जादा मिळाली आहे.
या उत्‍सव कालावधीत सुमारे २ लाखहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सव कालावधीमध्‍ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे १ लाख ५४ हजार ९४६ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत १ लाख ८८ हजार २०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या अशी माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सांगितले.
👉संकलन : रिपोर्टर राजेंद्र गडकरी, शिर्डी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!