कोरोना व्हायरसशी सध्या संपूर्ण देश लढत आहे. कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने पसरत आहे अनेकांना यामुळे मानसिक,आर्थिक स्थितीचा सामना करावा लागला आहे. लोकांनी आपल्या जवळील व्यक्तीला गमावले तर काहीच्या नोकर्या गेल्या यामुळे आर्थिक चणचण भासू लागली आहे . या महामारीमुळे सामान्य माणसांना नाहीच तर अनेक सेलिब्रिटींनासुद्धा याचा फटका बसला आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतच फेमस अभिनेत्री सोना मोहपात्रा हिने सोशल मीडियावर पोस्ट करत संगितले आहे की कशा प्रकारे ती आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तसेच तिची सर्व बचत एका चित्रपटासाठी खर्च झाली आणि कोरोना व्हायरसमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक फोटो शेअर करत आपबिती सांगितली आहे.
पोस्ट मध्ये लिहते की, “वेदनेपासून पळून जाऊ शकत नाही पण त्यासाठी अस्वस्थ होणे किंवा नाही ही आपली निवड आहे… जमेल तेव्हा मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते माझा चित्रपट#ShutUpSona अजूनही जगभर प्रवास करत आहे. अनेक फेस्टिवल जिंकत आह. माझी संपूर्ण कमाई या चित्रपटामध्ये चालली गेली. करोना व्हायरसमूळे आज मी या परिस्थितीशी लढत आहे. यांनी अशा ठिकाणी आणून उभे केले आहे की कमवण्याचा कोणताही मार्ग नाही” सोना मोहपात्राच्या या पोस्ट नंतर अनेकांनी दुख: व्यक्त केले आहे. सोना ची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.