संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः निर्जनस्थळी नेऊन खूनाचा प्रयत्न करणार्या आरोपीस पकडण्याची एमआयडीसी पोलीसांनी केली आहे. हर्षद गौतम गायकवाड (रा.दूध डेअरी चौक, विखे पाटील कॉलेज रोड, वडगाव गुप्ता शिवार ता. जि. अहमदनगर), बाळु शंकर काळे (रा.चेतना कॉलनी, नवनागापुर ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोसई राजेंद्र गायकवाड, पोसई दिपक पाठक, पोसई योगेश चाहेर, पांना विष्णु भागवत, पांना राजु सुद्रिक, पांना महेश बोरुडे, पोको किशोर जाधव, पोशि नवनाथ दहिफळे, पोकों सचिन हरदास तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे मपोना रिंकु मटेकर, पोकॉ राहुल गुड, पोकॉ नितीन शिंदे आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.26 सपप्टेेंबर 2023 रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास विखे पाटील हॉस्पिटल चायनागेटजवळ बंद पडलेल्या शेडमध्ये आरोपी हर्षद गौतम गायकवाड, बाळ शंकर काळे यांनी मागील भांडणाचे कारणावरून धारदार हत्याराने डोक्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या महेश बाबासाहेब आरु (रा.गजानन कॉलनी, नवनागापुर ता.जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं. 892/2023 भादवि कलम 307, 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, गुन्हयातील आरोपी हर्षद गौतम गायकवाड, बाळु शंकर काळ हे विळद बायपास या ठिकाणी बसल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीसांचे एक पथक तयार करुन त्यांना विळद बायपास येथे पाठविले. पोलीस पथकाने विळद बायपास येथून आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव हर्षद गौतम गायकवाड, बाळु शंकर काळे असे सांगितले.आरोपीकडून गुन्हयात वापरलेले हत्यार हस्तगत करत आहोत.
आरोपी हर्षद गोतम गायकवाड यांचेविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.