खासदार लंकेचे कट्टर समर्थक राहुल झावरेंवर हल्ला ; पारनेरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात

खासदार लंकेचे कट्टर समर्थक राहुल झावरेंवर हल्ला ; पारनेरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पारनेर : लोकसभा निवडणुकांनंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. खासदार निलेश लंके यांच्या विजयानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. खासदार लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बसस्थानकाजवळ हल्ला झाला आहे. या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्यांना जास्त इजा झालेली नाही. मात्र त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार श्री लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने पारनेर तालुक्यासह पोलिस तैनात करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत नगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा खासदार श्री लंके यांनी पराभव केला. या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण गरमागरम झाले आहे. दोन्ही पक्षांचे समर्थक आमनेसामने आले आहेत. खासदार श्री.लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने तातडीने बंदोबस्त तैनात केला आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!