संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
श्रीगोंदा ः खरातवाडी येथील मंदिर चोरीतील चोरीस गेलेला मुद्देमाल पाच दिवसात मिळवून चोरट्यास पकडण्यात आले आहे. एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, डिवायएसपी विवेकानंद वाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोनिसंजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार एसआय आर.टी शिंदे, पोकॉ शिपणकर, विनोद पवार, संदीप दिवटे, सतीश शिंदे, संदीप शिंदे,भांडवलकर, मपो वलवे आदिंच्या टिमने ही कारवाई केली.

रविवार (दि.23 जुलै) च्या रात्री खरातवाडी येथील तुळशीदास महाराज मंदिरातून लाऊडस्पीकरच्या भोंग्याचे युनिट, 3 लाऊड स्पीकरचे साऊंड व फिटिंगची केबल 4 हजार रुपये किमतीची असा एकूण 7 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या, यानंतर मंदिरात गावकर्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला असल्याने चोरी करणारा चोर सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने व त्याची ओळख पटून तो अतुल अर्जुन जाधव (खरातवाडी) येथील असल्याची खात्री झाल्याने मंदिराचे पूजारी गेना रामभाऊ खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुरन 305/2023 दाखल करण्यात आलेला होता. आरोपीस बेलवंडी पोलीस ठाण्याचे एएसआय आर टी शिंदे यांनी दि.24 जुलैला अटक करून पोलीस कोठडी दरम्यान पोलिस खाक्या दाखविताच चोरीस गेलेला 7 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपी हे सीसीटीव्हीमुळे निष्पन्न झाल्याने बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व ग्रामस्थांनी आपल्या गावातील मुख्य चौक तथा वाड्यावस्त्यांवर लोकवर्गणी किंवा ग्रामनिधीतून पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्या संकल्पनेतील पोलिसांसाठी एक कॅमेरा या योजनेअंतर्गत सीसीटीव्ही बसवून पोलिसांना सहकार्य करून गुन्हे प्रतिबंधाकरिता पुढे यावे, असे आवाहन पोनि संजय ठेंगे यांनी केले आहे.