खडका मडका ते प्रभूवाडगाव रस्ता दुरुस्ती निधीला प्रशासकीय मान्यता ; शेवगाव युवक काँग्रेसला यश


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव –
खडका मडका ते प्रभू वाडगाव या प्रलंबित रस्त्याचा दुरुस्तीसाठी जन सुविधा योजने अंतर्गत निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. अमोल फडके, शेवगाव पाथर्डी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बब्रु वडघने यांनी दिली आहे.


शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मागील वर्षी २१ जुलै रोजी खडका मडका ते प्रभू वाडगाव या रस्त्यासाठी गदेवाडी फाटा येथे २ तास रास्ता रोको, तसेच दि.१ फेब्रुवारी २०२२ रोजी पंचायत समिती बांधकाम विभागाला केलेल्या टाळे ठोक आंदोलनाला मोठे यश आले आहे. खडका मडका ते प्रभूवाडगाव, प्रभू वाडगाव ते खडका मडका अशा दोन टप्प्यात प्रत्येकी १४.७५ एकुण २९.५० लक्ष ₹ निधी मंजूर झाला असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. अशी बब्रु वडघने यांनी दिली आहे. या यशाबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकमेकाला पेढे भरवून आनंद व्यक्त केला! यावेळी शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक शहराध्यक्ष गणेश क्षिरसागर, राजेंद्र गिरगे, तालुका उपाध्यक्ष सखाराम ढोरकुले, उपाध्यक्ष निजाम भाई पटेल, उपाध्यक्ष जब्बार भाई शेख, युवक उपाध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, विद्यार्थी अध्यक्ष महेश काटे, अमोल दहिफळे, उपाध्यक्ष राजू शेळके, विलास निकाळजे, सुरेश निकाळजे, बाजीराव अंगारक आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे नेते प्रताप पाटील शेळके यांच्याकडे तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी मोठ्याप्रमाणात पाठपुरावा केला होता व शेळके यांनी त्यासाठी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रताप शेळके यांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!