कोरोना साथीच्या आजारात चांगल्या व्यक्तीला आपण मुकलो : कोरोना साथीत बळी गेलेल्या कुटुंबाच्या भेटी घेऊन प्रतापराव ढाकणेंनी केले सांत्वन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

बोधेगाव  : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापकाका ढाकणे यांनी  स्वतः कोरोना आजारातून बाहेर येऊन बऱ्याच दिवसानंतर कोरोना साथीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या  कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांना दिलासा देऊन कुटुंबियांना धीर देण्याचे काम केले. कोरोना साथीच्या  महाभयंकर लाटेमध्ये इच्छा असूनही कार्यकर्त्यांना भेटता येत नव्हते परिस्थिती भयावह होती त्यामध्ये अनेक महत्वाचे लोक साथीत गमावले आहेत त्यांचा कुटुंबासह गावाला दुःख झाले तर अनेक ठिकाणी कुटुंब प्रमुखांचा  या साथीत बळी गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहे.

त्यामुळे श्री ढाकणे  कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याचा निर्णय घेतला असुन ज्यांच्या घरी कोरोना आजाराची दुःखद घटना घडली आहे त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना दिलासा व धीर देण्याचे काम केले जात आहे.

शेवगाव तालुक्यातील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याच्या परिसरातील राणेगाव, शिंगोरी, बोधेगाव, अंतरवली, ठा निमगाव, हसनापूर, मंगरूळ यासह आदी गावामध्ये कोरोना साथीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियाच्या गाठीभेटी घेऊन अँड प्रतापकाका ढाकणे यांनी त्यांचे सांत्वन केले आहे.
  यावेळी राणेगांवचे सचिन श्रीरंग वाघ यांच्या कुटुंबीयांनची  तर बोधेगाव येथील भास्कर कुटे अंतरवली येथे बापूसाहेब  खताळ, मंगरूळ येथे काकडे, ठा.निमगाव येथे तुकाराम भगत व विष्णू कातकडे, संभाजी कातकडे, हसनापूर येथे संजय धायगुडे, विक्रम धायगुडे, या  कोरोना साथीत बळी गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची प्रतापराव  ढाकणे यांनी प्रत्यक्ष भेट  देऊन सांत्वन केले. 
  यावेळी अंबादास वाघ, सचिन वाघ, पांडुरंग वाघ, शहादेव वाघ, उपसरपंच शरद वाघ, उद्धव वाघ, माजी सरपंच गोरक्ष खेडकर,  संदीप बोडखे, तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉ प्रकाश घनवट, भास्कर कुटे, मधुकर कुटे, संभाजी गर्जे, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, पोपटराव केदार, कारभारी जावळे,माजी संचालक नवनाथ ढाकणे, माजी सरपंच संजय काकडे, मच्छिंद्र घोरतळे, एम , पी.आव्हाड , माजी तहसीलदार राजेंद्र दराडे, प्रमोद विखे,आंबादास दहिफळे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

संकलन -बाळासाहेब खेडकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!