कोयता दाखवून गुन्हे करणाऱ्यास पकडून चोरीचे मोबाईल हस्तगत ; कोतवाली पोलिसांची कारवाई

कोयता दाखवून गुन्हे करणाऱ्यास पकडून चोरीचे मोबाईल हस्तगत ; कोतवाली पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : धारधार प्राणघात हत्यार कोयत्याचा धाक दाखवून गुन्हे करणाऱ्या विधीसंघर्षीत बालकाला पकडून त्यांच्याकडून चोरी केलेले मोबाईल केले हस्तगत करण्याची कारवाई कोतवाली पोलीसांनी केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांनी दिलेल्या सुचनेनूसार सपोनि योगीता कोकाटे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, पो.ना. अविनाश वाकचौरे, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, सुजय हिवाळे, अमोल गाडे, होमगार्ड चंद्रकांत सोनवणे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की,दि.१५ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री ४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन, अहमदनगर परिसरात मोपेड दुचाकीवरुन संशयीतरित्या दोन मुल फिरताना दिसल्याने रात्रगस्त पोलिसांनी मोपेड दुचाकीवरील मुलांना हटकले. त्यातील एक मुलगा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. उर्वरित मुलास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता तो विधीसंघर्षीत बालक असल्याचे दिसून आले. त्याची सपोनि कोकाटे मॅडम यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक होंडा अॅक्टीवा कंपनीची बिगर नंबरची मोपेड, एक काळे रंगाचा त्यावर प्लॅस्टीक मुठ असलेला लोखंडी धारदार हत्यार लोखंडी कोयता, एक काळ्या रंगाचा त्यावर प्लॅस्टीक कव्हर असलेला ओपो मोबाईल फोन, एक रंगबिरंगी कव्हर असलेला रिअलमी मोबाईल फोन असे मिळून आले. त्याबाबत कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं. ३३२/२०२४ शस्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे.
पोनि प्रताप दराडे यांनी दिलेल्या आदेशान्वये विधीसंघर्षीत बालकाकडे गुन्ह्याचे अनुशंगाने अधिक विचारपुस केली असता त्याने तो त्याचा जोडीदारासह रात्रीचे वेळी शहरात फिरुन एकट्या दिसणारे इसमांना टार्गेट करुन त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम चोरी करित असल्याचे तसेच चोरी केलेले मोबाईल त्याचा मित्र अभिषेक केशव पवळ, रा. गांधीमैदान, अहमदनगर यास विक्री करण्याकरिता देत असल्याचे सांगितले. गुन्ह्यात एकुन ६ मोबाईल जप्त करण्यात आले. त्याबाबत अधिक तपास चालू आहे.
विधीसंघर्षीत बालकाचे ताब्यात मिळून आलेली मोपेड, ओपो मोबाईल हा चोरीचा असलेचे त्याने कळविले वरुन अधिक माहीती घेतली असता त्यांचे ताब्यात मिळून आलेला ओपो कंपनीचा मोबाईल बाबत तोफखाना पोलिस ठाणे, अहमदनगर येथे गु.र.नं. ३३४/२०२४ भादंवि क. ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत समजले. गुन्ह्याबाबत माहीती घेतली असता गुन्ह्यात चोरी गेला मोबाईल व विधीसंघर्षीत बालकाकडे मिळून आलेला ओपो मोबाईल हा एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!