संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : युवतीवर अत्याचार करणा-यास पकडून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. ज्ञानेश्वर राजेंद्र हापसे (रा.भिंगार अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की,दि ५ मार्च २०२१ रोजी ‘पासून त्यांची आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र हापसे (रा भिंगार अहमदनगर) याच्यासोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्या ओळखीच्या आधारे वेळोवेळी बाहेर भेटण्याचे बहाण्याने बाहेर घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुध्द तिच्याशी शाररिक संबंध ठेवले. शाररीक व मानसिक त्रास दिला. तसेच शरीरसंबंध ठेवण्यासाठी फोटो, व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत होता, या पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं. ८८१/२०२३ भा.द.वि. कलम ३७६ (२) (आय), ३७६(२) (एन), ५०४,५०६ तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधि १९८९ चे कलम ३(१)(डब्ल्यू) (T) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्हयाचा तपास नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे हे करत आहेत.

गुन्हयाचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना माहिती मिळाली. गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र हापसे (रा भिंगार अहमदनगर) हा भिंगारवेशीजवळ आलेला आहे. या माहितीनुसार गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी त्यास तेथे जाऊन ताब्यात घेऊन आरोपीस तात्काळ पोलीस ठाणे येथे आणून अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.