कै.बाळासाहेब विखे पा. यांची नगर जिल्ह्यात भाजपाला पूर्वीपासूनच मदतच… म्हणूनच पुन्हा उमेदवारी !

कै. बाळासाहेब विखे पा. यांची नगर जिल्ह्यात भाजपाला पूर्वीपासूनच मदतच… म्हणूनच पुन्हा उमेदवारी !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यादेवीनगर : विखे पा.घरण्याचा मागील इतिहास पाहता खा.डाॅ.सुजय विखे पा.यांचे आजोबा व महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचे वडील माजीमंत्री कै. बाळासाहेब विखे पा. यांनी भाजपला अहिल्यादेवीनगर उत्तर (शिर्डी लोकसभा मतदारसंघ) त्यावेळेचे उमेदवार स्व:खा. भिमराव बडदे तथा स्व: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे मित्र स्व:खा.बडदे यांना निवडून आणण्यात मोठा सिंहाचा वाट होता. हे विसरून चालणार नाही. या सर्व घडामोडीचे फलित म्हणजेच खा.डाॅ.सुजय विखे पा. यांना भाजपाने अहिल्यादेवीनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा दुसऱ्यांदा भाजपाची लोकसभेची उमेदवारी दिली, हे कशाचे द्योतक आहे.. हे अहिल्यादेवीनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व माजीमंत्री,आमदारांनी विसरून चालणार नाही. त्यामुळे विखे पा‌. घरण्याचे भाजपासाठी मोठेच योगदान राहिले आहे.
त्यावेळेचा घटनाक्रम पाहता… सध्या शिर्डी आणि पूर्वाश्रमीच्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघात १९९६ सालची निवडणूक स्व. गोपीनाथ मुंडे आणि निवडणुकीच्या मैदातात नसलेल्या कै. बाळासाहेब विखे पाटलांनी गाजवली.  मुंडे येथे येऊन म्हणाले ‘सुदर्शनचक्र फिरणार आहे. भाजप जिंकणार आहे.’ पाठोपाठ विखे पाटलांनी खरोखरच सुदर्शनचक्र फिरवले. युतीच्या कार्यकर्त्यांची प्रयत्नांची शर्थ केली. कुणाच्या ध्यानीमनी नसताना कै. भीमराव बडदे भाजपचे खासदार म्हणून लोकसभेत गेले. वजनदार व सुसंस्कृत नेता अशी प्रतिमा असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कै. शंकरराव काळे पराभूत झाले.


विखे पाटील यांचे काँग्रेससोबत बिनसले आणि येथून काळे यांना उमेदवारी मिळाली. विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर शिडींतून नुकतेच आमदार झाले होते. शिवसेनेत जाऊन मंत्रिपद मिळविण्याच्या मूडमध्ये होते. मुंडे हे बडदे यांचे महाविद्यालयीन मित्र. दोघांनी पुण्यात पक्ष विस्ताराचे काम सोबत केले. बडदेंना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, येथे भाजपची फार मोठी ताकद नव्हती. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे पाटील आणि प्रा. ना. स. फरांदे हे दोन्ही नेते होते. मात्र, ते राज्य पातळीवर कार्यरत होते. त्यामुळे बडदे यांची उमेदवारी जाहीर होताच काळे मोठ्या मताधिक्याने
विजयी होतील. निवडणूक एकतर्फी होईल, अशी चर्चा सुरू झाली.
विखे पाटलांसह जवळपास सर्व आमदार काँग्रेस पक्षाचे होते. काळे हे राज्यभर वजनदार आणि सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जात, तर बडदे यांचे कार्यक्षेत्र केवळ कोपरगाव तालुक्यापुरते होते. सामना विषम असल्याने निवडणूक सुरू होण्याअगोदरच निकाल काळेंच्या बाजूने लागेल, असे बोलले जायचे. मात्र, राज्यात भाजप-शिवसेना युतीची हवा सुरू होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या ध्वनिफिती ऐकण्यासाठी तरुण मंडळी चौकाचौकांत गोळा व्हायची. मुंडे आणि स्व. प्रमोद महाजन यांच्या वक्तृत्वाची जनतेला भुरळ पडत होती. बडदे वयाने तरुण आणि फडें वक्ते. काळे यांच्या वयाचा मुद्दा त्यांनी केंद्रस्थानी ठेवला. सामान्य मतदार युतीच्या बाजूने झुकलेला दिसत होता.
कै. विखे पाटील अस्वस्थ होते. मुंडेंनी विखे पिता-पुत्रांची राजकीय शक्ती भाजपच्या बाजूने वळविली. प्रचाराच्या सांगता सभेसाठी मुंडे राहात्यात आले. बाजारतळ गर्दनि तुडुंब भरलेले होते. मुंडे म्हणाले की, या निवडणुकीत चमत्कार होणार आहे. सुदर्शनचक्र फिरणार आहे. माझा मित्र भीमराव लोकसभेत जाणार आहे. त्यांचे हे सूचक विधान चर्चेचा विषय ठरले. विखे पाटलांनी सुदर्शनचक्र फिरविले आणि बडदे खरोखरीच लोकसभेत गेले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!