केतकी चितळेची आतापर्यंतची सर्वांत वादग्रस्त विधाने

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे
तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री केतकी चितळे कोणत्या ना कोणत्या कारणाने ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची मते मांडत असते. अनेकदा यावरून तिला ट्रोलही केले जाते.केतकी चितळे आणि वाद हे जणू समिकरणच बनले आहे. केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिची फेसबुक पोस्ट वादाचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा एका स्टँडअप कॉमेडियनने एकेरी उल्लेख केला होता. तो वाद ताजा असतानाच या मुद्यावरून अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट केली होती. तिची ही पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. केतकीने लिहिल होते की, शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!

सुधारणा करा बाळांनो, शिका.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!