केडगाव उपनगरात बिबट्याचा धुमाकूळ, एकजणावर हल्ला

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः शहरातील केडगाव या उपनगरातील अंबिकानगर परिसरात wmns air 1 mid nike air max 97 gucci nike air max 97 gucci air max goaterra 2.0 cheap cheap jordans air max goaterra 2.0 air jordan 11 cmft low cheap cheap jordans air jordan 4 retro military black air jordan 4 retro military black red and black jordan 1 air max goaterra 2.0 nike air max 270 wmns air max 270 nike air max 270 निवारी (दि.24 फेब्रुवारी 2024) सकाळपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. दुपारी उशिरापर्यंत त्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत होते. या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले. तब्बल 7 तासांच्या थरारानंतर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. शनिवारी सकाळपासून केडगावच्या अंबिकानगर परिसरातील वसाहतीमध्ये फेरफटका मारत होता. राधेशाम कॉलनी परिसरात सकाळी तो काही लोकांना दिसताच, त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे केडगावसह शहरात सर्वत्र ही माहिती पसरली. केडगावला बिबट्या आल्याची माहिती मिळताच खात्री करण्यासाठी नगरकरांनी एकमेकांना फोन करून माहितीची खात्री करून घेतली. तो पर्यंत बिबट्याने केडगावमध्ये हिंस्त्ररूप धारण केले होते.


रस्त्याने जाणारे त्याला पहायला आलेले, त्याच्या मागे पळणारे यांच्यापासून बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. त्यात दोघे जखमी झाले आहेत. अंबिकानगर परिसरात दुचाकीस्वारावर त्याने झडप घातल्याने यावेळी यात विजय चव्हाण हे गृहस्थ गंभीर जखमी झाले. दोन जखमींपैकी एकाला पाठीवर व पोटावर नखे लागली आहेत, तर दुसर्‍याला डोक्याला चावा घेण्याचा प्रयत्न केल्याने ते गंभीर जखमी झाले. जवळपास चार तास बिबट्या पुढे आणि नागरिक मागे असा खेळ सुरू होता.
दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाला तातडीने याची माहिती देण्यात आली. ते येईपर्यंत बिबट्या परिसरातील विविध बंगल्यांच्या आवारात, झाडा झुडपात, चारचाकी वाहनांच्या मागे, कंपाऊंड वॉलच्या मागे अशी जेथे जागा मिळेल तेथे आश्रय घेत होता. प्रत्यक्ष फिरताना अनेकांनी त्याला पाहिले असून, एवढा मोठा बिबट्या यापूर्वी कधी पाहिला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!