कुकाणे – कौठा रस्त्याची दुरवस्था….!


जीवन ज्योत फाऊंडेशन संघटनांतर्फे तालुका अभिंयाता यांना काळे फासणार…!
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नेवासा :
पावसाळा सुरू झाला , तरी तालुक्यातील ते कौठा रस्तादुरुस्तीचे काम अजूनही अपूर्णच आहे . बांधकाम विभागाच्या नेवासा फाटा येथील नेवासा कुकाणे कार्यालयासमोर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा कुकाणा परिसरातील नागरिक कुकाणा, देवगाव, जेऊर हैबती, तरवडी, फत्तेपूर, शहापूर सह परिसरातील दहा कुकाणा ते घोडेगाव मार्ग नगरला जाण्याकरिता सोयीचा आहे. मात्र, सद्यःस्थितीत कुकाणा ते देवगाव पुढे देवगाव ते फत्तेपूर व कौठा असा दहा किलोमीटर रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावर दुचाकी चालवणेही मुश्किलीचे झाले आहे.

खराब रस्त्यामुळे कुकाणा परिसरातील नागरिकांना नेवासा फाटामार्गे २० किमीचा अधिक प्रवास करून नगर, सोनई, घोडेगाव, शनिदर्शनासाठी शनिशिंगणापूरला अधिक वेळ व इंधन खर्च करून जा – ये करावी लागत आहे . घोडेगाव ते चांदा व कौठ्यापर्यंत रस्तादुरुस्ती झाली , पण पुढे कुकाण्याच्या दिशेने कौठ्यापासून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षभरापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे . आता पावसाळा सुरू झाल्याने पहिल्याच पावसात खड्ड्यात पाणी साचून धोकादायक ठरणार असल्याने हा मार्गच बंद करण्याची वेळ येणार आहे . अशी परिस्थिती असतानाही बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे .शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव शेवगाव दहिगावने, शहरटाकळी या मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांसाठी नगर , पुणे जाण्यासाठी हाच मार्ग सोयीचा आहे . कुकाण्यासह परिसरातील २०-२५ खेड्यांना हा मार्ग अत्यावश्यक असतानाही पावसाळा सुरू झाला तरी बांधकाम विभाग निद्रितावस्थेत कसा , असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.सौंदाळा येथील जीवन ज्योत फाऊंडेशन चे कमलेश नवले पाटील, अक्षय बोधक,विशाल तुपे, विशाल शिंदे,आप्पासाहेब आरगडे,नितीन आरगडे,अभिजीत बोधक,संदेश बोधक,कल्याण ठुबे,सागर रधवै,काकासाहेब ठुबे,चंद्रकांत आरगडे,नानासाहेब आरगडे, प्रदिप आरगडे, शकिल शेख आदींनी या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल संताप व्यक्त करुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे . गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला हा रस्ता पावसाळ्यातही दुरुस्त होतो की नाही. याबाबत साशंकता व्यक्त आहे . याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाना अनेक वेळा निदर्शनास आणून दिले असून देखील संबंधित आधिरारी दुरूस्तीच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे खड्डे नाही बुजवल्यास जीवन ज्योत फाऊंडेशन या संघटनेच्या वतीने येत्या पंधरा दिवसामध्ये निष्पाप वाहनधारकांचा बळी घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे नेवासा तालुकाउपविभागीय अभिंयाता यांना काळे फासणार ईशारा देण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!