ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जम्मू काश्मीर- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एकूण ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दोन लष्कराच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर पुलवामा येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा सेनापती बुरहान वानी यांच्या मृत्यूला आज पाच वर्षे झाली आहेत. ८ जुलै २०१६ रोजी कोकेरनागमध्ये बुरहान वानीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर, दरवर्षी ८ जुलै रोजी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असतात, परंतु असे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी सुरक्षा दलांनी त्यांचा डाव उधळून लावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम पोलिसांच्या संयुक्त कारवाईत कुलगामच्या जोदर भागात लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, चकमकीच्या वेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याच्या बर्याच संधी दिल्या, परंतु दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरूच राहिला, ज्यास सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले.