काळे कुटूंबियांचे राणीताई लंके यांच्याकडून सांत्वन ; मांजरीला वाचविताना पाच जणांचा झाला होता मृत्यू

काळे कुटूंबियांचे राणीताई लंके यांच्याकडून सांत्वन
मांजरीला वाचविताना पाच जणांचा झाला होता मृत्यू
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नेवासा : मांजरीला वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा मंगळवारी दुर्देवी मृत्यू झाला. काळे कुटूंबातील चार जणांचा त्यात समावेश आहे. शनिवारी मा. आ. नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी वाकडी येथे जाऊन काळे कुटूंबियांचे सांत्वन केले.
नेवासे तालुक्यातील वाकडी येथे मांजरीला वाचविण्यासाठी गेलेले सहा जण बायोगॅसच्या खडयात बुडूले होेते. बायोगॅसच्या खडडयात मांजर पडल्याने तीला वाचविण्यासाठी एकजण खड्ड्यात उतरला होता. तोही बुडू लागल्याने इतर पाच जणही खाली उतरले मात्र ते ही बुडाले. त्यापैकी एका खड्डयाबाहेर काढण्यात नागरीकांना यश आले होते. एकाच कुटूंबातील चार जण व त्यांचा एक शेजारी पाच जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. विशाल उर्फ बबलू काळे, अनिल काळे, माणिक काळे, संदीप काळे, बाबासाहेब गायकवाड यांचा मृत्यू झाला तर विजय काळे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
राणीताई लंके यांनी सांगितले की, पुर्वनियोजित जनसंवाद यात्रेमुळे नीलेश लंके हे व्यस्त असून त्यांच्याच सुचनेनुसार आपण वाकडी येथे येत काळे कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!