संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नगर तालुक्यातील कामरगाव येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
नगर- पुणे महामार्गालगत असणाऱ्या कामरगाव मधे कातोरेवाडी येथे मागील २३ वर्षापासून हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. सालाबाद प्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात भव्य संगीत हनुमान चरित्र कथा चार दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामधे हर्षल सुखदेव महाराज ढवळे यांनी कथा वाचन केले. यामधे दररोज हरीपाठ, आरती , वीणा वादन,कथा वाचन इ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हनुमान जयंती दिवशी श्यामसुंदर महाराज नानेकर यांचे काल्याचे किर्तन झाले. काल्याच्या कीर्तन प्रसंगी टाळ व साथ देण्यासाठी राम महाराज नानेकर यांचे शिष्यगण व गुरुकृपा संगीत विद्यालयाचे शिष्य उपस्थित होते. काल्याचे किर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम सांगता प्रसंगी विदयमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण अण्णा ठोकळ, राजेंद्र आंधळे, श्यामराव आंधळे, तसेच सरपंच तुकाराम कातोरे हे उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ग्रा.पं. सदस्य संदीप ढवळे यांनी आभार मानले.
कामरगाव मधील कातोरेवाडी येथील हनुमान जन्मोत्सव सोहळयासाठी छगन कातोरे सर, सुनिल चौधरी, सोन्याबापू कातोरे, भाऊसाहेब जनार्दन ठोकळ, कोकाटे बंधू, राजू कुसाळकर, मंगेश कातोरे, रामचंद्र कातोरे, दशरथ कातोरे, महेश कातोरे सर, अनिल महाराज कातोरे, संतोष शिंदे डेकोरेटर्स, विजय लाळगे केटरर्स आदिंनी परिश्रम घेतले.