काँग्रेस धावली शिवसेनेच्या मदतीला ; राठोड धमकी प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना धमकीचे पत्र शिवालयावरती आले होते. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देखील दाखल केली आहे. मनपा पोटनिवडणुकीतील नाट्यमय घडामोडींनंतर आज शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह थेट शिवालय गाठत विक्रम राठोड यांची भेट घेवून काँग्रेस आपल्या पाठीशी असल्याचे राठोड यांना सांगितले. त्यामुळे आज काँग्रेस शिवसेनेच्या मदतीला धावून गेल्याचे शहरात पाहायला मिळाले. धमकी पत्रात ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. बोराटे, फुलसौंदर यांच्याशी देखील दूरध्वनीद्वारे संवाद साधत काळे यांनी काँग्रेस आपल्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.
यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 
सप्टेंबर महिन्यामध्ये किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने शहरातील आयटी पार्कचा भांडाफोड करत राष्ट्रवादीच्या आमदारांवर तोफ डागली होती. आ.संग्राम जगताप यांनी किरण काळे यांच्या विरोधात पत्रकार परिषदेत काळे यांच्यावर देखील अनेक आरोप केले होते. यावेळी किरण काळे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा खोटा असल्याचा दावा काळे यांनी यावेळी केला होता. त्याचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र काळे यांच्यावर आलेल्या प्रसंगात विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, संग्राम शेळके, मदन आढाव यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते सुवेंद्र गांधी हे किरण काळे व काँग्रेसच्या मदतीला धावून जात त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची त्यावेळी भेट घेतली होती. 
विक्रम राठोड यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगात काँग्रेसने उतराई होत राठोड यांच्या मदतीला धावून येण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी विक्रम राठोड व किरण काळे यांच्यामध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी मनपा पोटनिवडणूकीवर देखील चर्चा झाल्याचे समजते. मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही. यावेळी काळे म्हणाले की, विक्रम राठोड हे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. ते शिवसेनेचे नेते आहेत. स्व.अनिलभैया राठोड यांचे रक्त त्यांच्यामध्ये आहे. अशा गोष्टींना ते कदापि भीक घालणार नाहीत. 
मात्र सतर्क राहण्याची गरज आहे. यापूर्वी शहरामध्ये शिवसैनिकांच्या केडगाव दुहेरी हत्याकांडाची दुर्दैवी घटना घडलेली असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार हे आरोपी राहिलेले आहेत. प्रामाणिक शिवसैनिक व नगर शहरातील जनता ही घटना कधीही विसरू शकत नाही. राठोड यांना दिलेल्या धमकी पत्रामध्ये देखील “संग्रामभैया” असा उल्लेख असून काटा काढण्याची धमकी देण्यात आली आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी माझ्या कार्यालयावर देखील अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत मला देखील त्यावेळी “तू आमच्या संग्रामभैयांच्या नादाला लागला तर तुझा कायमचा काटा काढू” अशी धमकी दिली होती. त्यावेळी मी देखील रितसर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असल्याची आठवण यावेळी किरण काळे यांनी करून दिली आहे. 
विक्रम राठोड, स्व.अनिलभैय्या यांच्या विचारांनी चालणारी शिवसेना तसेच मी व माझे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नगर शहरातील नागरिकांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीने अशा दहशतीच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असतो. त्यामुळे केडगाव सारख्या दुहेरी हत्याकांडाची पुनरावृत्ती भविष्यात शहरातील या अपप्रवृत्तींकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता किरण काळे यांनी व्यक्त केली आहे. 
“त्यांची” दहशत काँग्रेस मोडून काढणार : यापूर्वी मला दिल्या गेलेल्या धमकीत तसेच विक्रम राठोड यांना आलेल्या धमकी पत्रात संग्रामभैय्याचा नाद केला तर तुमचा काटा काढून असे म्हणले आहे. अशा पोकळ धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही. आ. संग्राम जगतापांच्या दहशतीला काँग्रेसचा छोट्यात छोटा सामान्य कार्यकर्ता सुद्धा घाबरत नाही. काँग्रेस कार्यकर्ते हे लढवय्ये असून शहरासाठी विघातक असणाऱ्या अशा प्रवृत्तींच्या दहशतीचा बीमोड करत शहराच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. जगतापांचा दहशतीला कायमस्वरूपी मोडीत काढण्याचे काम हे काँग्रेसच करणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. 
जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार…किरण काळे म्हणाले की हे प्रकरण गंभीर असून याबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची मी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह समक्ष भेट घेणार असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे करणार आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्याची व सतर्कता पाळण्याची गरज असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 
“ती” भूमिका शिवसेना विरोधात नाही…. पोटनिवडणुकीत महविकास आघाडी उमेदवाराचा झालेला पराभव यासाठी शिवसेना हा पक्ष म्हणून जबाबदार नसून केवळ प्रभारी शिवसेना शहर प्रमुख यांचा वैयक्तिक आडमुठेपणा भोवला असल्याचे काँग्रेसचे मत असून काँग्रेस शिवसेनेमध्ये कोणतेही वाद नाहीत, असे काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना व काँग्रेसचे संबंध हे पूर्वीपासूनच चांगले असून यापुढील काळात देखील दोन्ही पक्षांमध्ये समन्वय राहणार असून स्व.अनिलभैय्या यांच्या विचारांना मानणाऱ्या पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक यांच्यासह शिवसेनेचे समवेतचे काँग्रेसचे संबंध चांगले असल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी उमेदवाराच्या पराभवाला अनेक कारणे असून यापैकी राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजप नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार केल्याचा व्हायरल झालेला फोटो हा खूप काही बोलत असून नगरकरांना या निवडणुकीत अंधारात नेमके काय घडले हे लक्षात आले असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुरेश तिवारी यांची देखील किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेत सुमारे अर्धा तास चर्चा केली आहे. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!