संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत – कोरोनाच्या काळात रुग्णांना चांगली सेवा दिल्यामुळे कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांचा सन्मान पत्रकार मोतीराम शिंदे परिवाराच्या वतीने कर्जतचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्कारसमारंभ प्रसंगी बोलताना पोनि चंद्रशेखर यादव म्हणाले की, या कोरोना सारख्या महाभयंकर महामारी च्या काळात कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स नर्स व त्यांच्या स्टाफने स्वतःचा जीव धोक्यात घालून चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा केली होती व करत आहेत. प्रामुख्याने या उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या साधारण व सर्वसामान्य कुटुंबातीलच असते. कारण सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडणारा नसतो. म्हणून अनेक रुग्ण कोरोनाचे असो किंवा इतर आजाराचे असो ते प्रत्येकजण कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत व चांगल्या उपचारासाठी येत असतात. त्यांची व्यवस्थित दखल घेऊन त्यांचे उपचार करण्याचे काम उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स प्रामाणिकपणे करत असतात. कोरोना काळात अनेक डॉक्टर्स व नर्स यांना कोरोनाची लागण झालेली होती. तरी पण त्याला न डगमगता या डॉक्टरांनी रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. या केलेल्या सेवेबद्दल कुठेतरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान होणे गरजेचे वाटत असल्याने येथील शिंदे परिवार यांच्या वतीने डॉक्टर्स व नर्स तसेच कर्मचारी यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. या छोट्याशा सन्मानामुळे तुम्ही लोकांनी केलेल्या आरोग्यसेवेचे कौतुक होते, असेही पोनि श्री यादव यांनी म्हटले.
यावेळी डॉ. कुंडलिक अवसरे , डॉ. सचिन डफळ, डॉ शबीना शेख , रावसाहेब भोसले ,मुजफर सय्यद, मारोती जाधव, किरण मुसळे, श्रीमती विद्याकैतके, अर्चना जाधव, महेमुनिसा झारेकरी, मोहिनी नागरगोजे, कु. वरजेरकर शामल, सुप्रिया कांबळे, किरण समुद्र, जय छजलाने, ज्योती चावरे आदिंचा सन्मान करण्यात आला. या वेळी शिंदे परिवारातील संतोष शिंदे, गणेश शिंदे, अविनाश शिंदे, आकाश कटके, सोमनाथ शिंदे, ओंकार शिंदे, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.