कत्तलीस नेणारे १९ गोवंशीय जनावरे, वाहनासह पावणे सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: कत्तलीसाठी आणलेले १९ गोवंशीय जनावरे व वाहने असा एकूण १५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोसई धाकराव, सफौ. भाऊसाहेब गोविंद काळे, पोना सचिन आडबल, पोना संतोष राजेंद्र खैरे, पोकॉ राहित मिसाळ, पोकॉ रणजित जाधवे, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ भाऊसाहेब राजु काळे, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.
अहमदनगर येथे व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणलेले आहेत,ही एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने माहिती ठिकाणी जाऊन खात्री करता त्या ठिकाणी पिकअप गाडी (एमएच. १६ एवाय. २८३६), अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ( एमएच. १६ एवाय. ६२८०), टाटा कंपनीचा ACE टेम्पो ( एमएच. ४५ एएफ. ३४६९) या मधून कत्तलीसाठी जनावरे आणल्याचे दिसून आल्याने त्या वाहनांमधील इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे असद गफुर शेख (वय ३६, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर), मजर महंमद हनिफ कुरेशी (वय ३६, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर), सिध्दीक असिफ कुरेशी (वय २२, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर), शहाजान अब्दुल कलीम कुरेशी, असे आयनुर रफिक कुरेशी (वय ३४, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर) नासिर बाबु कुरेशी (वय ४५, रा. कसाई गल्ली, आंबेडकर चौक, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्याकडे अधिक विचारपुस करता मुश्ताक हाजी इब्राहिम कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला झेंडीगेट, अहमदनगर) हा गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्जात २ लाख २५ हजार रुपये किमतीचे १९ गोवंशीय जनावरे, १३,व लाख ५० हजार रुपये कि. चे ३ वाहने असा एकूण १५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत एलसीबीचे पोकाॅ रविंद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गु. र. नं. १२७५/२०२३ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५ (अ), (ब), ९ (ब) व प्राण्यांना निर्दयतेने वागविणे कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई कोतवाली पोलीस करीत आहे.