शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्याटिमची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी ः चारा पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय न करता उपाशी ठेवून कत्तली करिता एकत्र पिकप वाहनांमध्ये जमा करून घेऊन जात असताना 32 गोवंश जातीचे जनावरासह असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात शिर्डी डिवायएसपी संदीप मिटकेयांच्या टिमने पकडला. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनाअशोक शिंदे, असीर सय्यद, पोना राशिनकर, पोकॉ दिनेश कांबळे, पोकॉ मच्छिंद्र इंगळे, पोहेकॉ थोरमिसे आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.25 नोव्हेबर 2023 रोजी शिर्डी डीवायएसपी संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, ममदापूर शिवारात (ता. राहाता) येथील अनिल उंडे यांच्या शेतजमिनीत एका पांढरे रंगाचे मॅक्स पिकप गाडीमध्ये कत्तली करीता गोवंश जातीचे जनावरे आणले आहेत . त्याबाबत आपले पथकातील अंमलदार यांना त्या ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकातील अंमलदार यांनी ममदापूर गावातील त्या ठिकाणी जाऊन खात्री केली. तेथे शेतामध्ये एक पांढरे रंगाचे पिकप व त्यामध्ये गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरलेले ओरडताना मिळून आले. पिकपमधील व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव सुफियान मेहबूब कुरेशी (रा. ममदापूर ता. राहता) असे सांगितले. त्याचे ताब्यातील पिकप वाहनाची पाहणी करता त्यामध्ये गोवंश जातीचे 32 जनावरे मिळून आले. त्यांच्यासमोर चारा पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय न करता उपाशी ठेवून कत्तली करिता एकत्र पिकप वाहनांमध्ये जमा करून ठेवले होते. म्हणून इसमास व पिकपमधील गोवंश जातीचे जनावरासह असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 685/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 (सुधारित2015) चे कलम 5(अ).5(क).9(अ)9(ब) सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम1960चेकलम 11(च)(ज) पोकॉ दिनेश कांबळे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.