ओबीसी राजकीय आघाडी लोकसभा मतदारसंघातील अहिल्यादेवीनगरचे अधिकृत उमेदवार अशोकराव सोनवणे
अहिल्यादेवीनगर येथे ओबीसी राजकीय आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची यादी जाहीर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यादेवीनगर : ओबीसी राजकीय आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील अधिकृत उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यात अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी अशोकराव सोनवणे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. यामुळे नगर दक्षिणेचे ओबीसी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अशोकराव सोनवणे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. यामुळे विशेषतः मूळ ओबीसी समाजात ओबीसी राजकीय आघाडी स्थापन करून मूळ ओबीसी लोकसभेचा उमेदवार असणार असल्याने अनेक मूळ ओबीसींनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी ही लढाई मूळ ओबीसींच्या आरक्षणासाठी व हक्कासाठी असल्याने प्रत्येक मूळ ओबीसींनी जागृत होऊन ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन ओबीसी राजकीय आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.