संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : ओंकार भागानगरे या तरुणाच्या खूनप्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या तिघांना अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडले. पकडण्यात आलेल्यांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आरोपी गणेश हुच्चे याचा चुलत भाऊ वैभव हुच्चे, आरोपी संदीप गुडा याचा भाऊ सागर गुडा तर तिसरा हा भिंगार येथून रवि नामदे याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अवैध धंद्यांची माहिती दिल्याच्या कारणातून ओंकार भागानगरे याचा सोमवारी (दि.१९) रात्री तलावरीने खून करण्यात आला. याप्रकरणी गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर तिघेही हल्लेखोर फरार झाले आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पोलिस पथके तपासासाठी रवाना झाली आहेत.