संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वच विभागांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. या परीक्षांच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी संबंधित विद्युत विभाग व संबंधित प्रशासकीय विभागाने घ्यावी, अशी विनंती विद्यार्थ्यांच्या वतीने प्रा. अमोल खाडे यांनी केली आहे.