एम.डी.इंडिया महात्मा फुले जनआरोग्य योजना अहमदनगरचे निलंबित जिल्हाप्रमुखांवर गुन्हा दाखल करुन कारवाई व्हावी ; रासपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : हे पैसे आरोग्यमंत्र्यांना द्यावे लागतात असे सांगतो, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेल्या रुग्णालयाकडून अवास्तव पैशांची मागणी करतो. पैशांची पूर्तता न केल्यास रुग्णालयावर कारवाईची धमकी देतो. यासह आरोग्यमित्रांना विविध प्रकार त्रास देणाऱ्या या एम.डी.इंडिया महात्मा फुले जनआरोग्य योजना अहमदनगरचे निलंबित जिल्हाप्रमुख निलेश भुसारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिष्टमंडळात पक्षाच्या अहमदनगर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर, आत्माराम कुंडकर, अजित माळवदे, शिवाजी वेताळ, राहुल निकम, प्रविण पहिलवान आदिंसह राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदना म्हटले की, एम.डी. इंडिया महात्मा फुले जन आरोग्य योजना अहमदनगरचे जिल्हाप्रमुख निलेश भास्कर भुसारी याच्यावर कडक कारवाई करुन गुन्हा दाखल करावा. निलेश भुसारी (रा. अहमदनगर) यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांनी अनेक आरोग्य मित्रांना त्रास दिलेला आहे. त्यांच्याकडून दरमहा २ हजार रुपयांची लाच घेत असे व जे आरोग्य मित्र ही मागणी पूर्ण करु शकत नाही, अशा आरोग्य मित्रांना विविध प्रकारे छळ करत असे, त्यांची दूर बदली करणे अथवा कामावरून काढून टाकणे असे अनेक प्रकार त्रास देतो. या जाचाला कंटाळून काही आरोग्य मित्रांनी आत्महत्तेचा प्रयत्न सुद्धा केला, पण सुदैवाने कोणी प्राणास मुकले नाही. भितीपोटी कोणी त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला तयार नाही. ज्या आरोग्य मित्रांनी पैसे दिले नाही, अशा आरोग्य मित्रांना त्यांनी नोकरीवरून काढले. त्या रिक्त जागी नवीन भरती करण्यासाठी व जून्या कामावरून काढलेल्या आरोग्य मित्रांना परत कामावर घेण्यासाठी प्रत्येकी ३० हजार रुपयांची मागणी करत आहे. हे पैसे आरोग्यमंत्र्यांना द्यावे लागतात असे तो सांगतो. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना असलेल्या रुग्णालयाकडून सुद्धा अवास्तव पैशांची मागणी करतो. पैशांची पूर्तता न केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची धमकी देतो. एका रुग्णालयाकडून त्यांनी एक लाख रुपये पेक्षा जास्त किंमतीचा मोबाइल घेतला, एका रुग्णालयाकडे मला होंडासिटी घ्यायची तिचे डाऊन पेमेंट द्या, अशी मागणी केली. एका रुग्णालयाकडे तब्बल २० लाख रुपयांची मागणी केली. अशा प्रकारे लाखो रुपयांची मागणी करणे अथवा मोठ्या किंमती असलेल्या भेट वस्तूची मागणी करणे तसेच महिला रुग्णांची चौकशीच्या नावाखाली छेडछाड करणे, विनयभंग करणे अशा अनेक तक्रारी आहेत. बदनामी होऊ नये, म्हणून महिला रुग्ण व रुग्णालयांनी प्रकरण बाहेर येऊ दिलं नाही. त्यामुळे हा आणखी गुन्हे करत आहे. अनेक तक्रारी इसमाविरुद्ध आहेत. त्याच्याविरुद्ध आमदार व समाजसेवक यांच्या सुद्धा तक्रारी आहेत. असे असताना सुद्धा हा मग्रुरीने वागत आहे. त्याला कोण साथ देतो याचा शोध घेऊन त्या संबंधितांवर करवाई करावी. अशा विकृत मनोवृत्तीच्या इसमावर नुकतीच निलंबनाची कारवाई झाली आहे. परंतु नुसते निलंबन होऊन चालणार नाही तर या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन
छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत निवेदन राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री, महासूलमंत्री तथा पालकमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे सीईओ यांना पाठवले आहे.