एकनाथ शिंदे ४० आमदारांसह गुवाहाटीत दाखल; हॉटेल रॉलिसनमध्ये बैठक !


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
गुवाहाटी :
महाराष्ट्राच्या सत्ताधा-याचा गोंधळ वाढला असून, आता गुजरात येथून एकनाथ  शिंदे यांच्यासह ४० बंडखोर आमदार सुरतहून विशेष विमानाने गुवाहाटीत गेले  आहेत. सुरत विमानतळावर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडले नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्यासोबत एकूण ४० आमदार आहेत, त्यापैकी ३४ शिवसेनेचे आणि ७ अपक्ष आहेत.
बसेस हॉटेल ‘ली मेरीडीयन’ येथून निघून सुरत विमानतळाव
रून सुरतमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे शिवसेनेच्या 35 आमदारांना गुवाहटी (आसाम) येथे नेण्यात आले आहे. विमानतळावर भाजपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसोबत दिसले होते, असे सूञांनी सांगितले आहे.
अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सुरतच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले होते. काल त्यांच्या पत्नीने पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस गुजरातला रवाना झाले आहेत.


गुवाहाटीत पोहचलेल्या शिवसेना आमदार एकनाथ शिंदे (कोपरी), अब्दुल सत्तार (सिल्लोड, औरंगाबाद), शंभुराज देसाई (पाटण, सातारा), संदिपान भुमरे  (पैठण, औरंगाबाद), भरत गोगावले (महाड, रायगड) नितीन देशमुख (बाळापूर, अकोला) अनिल बाबर (खानापूर-आटपाडी, सांगली), विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम), लता सोनवणे (चाेपडा ), संजय गायकवाड  (बुलडाणा), संजय रायमूलकर ( मेहकर), महेश शिंदे (कोरेगाव, सातारा), शहाजी पाटील (सांगोला, सोलापूर), प्रकाश आबिटकर (राधानगरी, कोल्हापूर), संजय राठोड ( दिग्रस, यवतमाळ), ज्ञानराज चौगुले (उमरगा, उस्मानाबाद ), तानाजी सावंत ( परंडा, उस्मानाबाद), संजय शिरसाट  (औरंगाबाद पश्चिम), रमेश बोरनारे (वैजापूर, औरंगाबाद), श्रीनिवास वनगा (पालघर), बालाजी कल्याणकर (नांदेड), बालाजी किणीकर (अंबरनाथ), सुहास कांदे (नांदगाव), महेंद्र दळवी (अलिबाग), प्रकाश सुर्वे (मागाठणे), महेंद्र थोरवे (कर्जत), शांताराम मोरे (भिवंडी), किशोर पाटील (पाचोरा), चिमणराव पाटील (एरंडोल), प्रदीप जैस्वाल (औरंगाबाद)
👉उद्धव ठाकरेंच्या संपर्कातील आमदार :
वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, रवींद्र वायकर, राहुल पाटील, उदय सामंत, प्रकाश फातर्पेकर, सुनील प्रभू, गुलाब पाटील, भास्कर जाधव, संतोष बांगर, आदित्य ठाकरे, राजन साळवी , अजय चौधरी,  दिलीप लांडे,  सदा सरवणकर,  दादा भुसे, संजय पोतनीस, सुनील राऊत,  कैलास पाटील,  दीपक केसरकर, यामिनी जाधव, रमेश कोरगावकर, योगेश कदम, मंगेश कुडाळकर, प्रताप सरनाईक यापैकी काही आमदार शिंदेंच्या संपर्कात.
महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची शिवसेनेत सुरू असलेल्या भांडणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ओरिजिनल शिवसेना कोण आणि डुप्लिकेट शिवसेना कोण? यावर शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणती आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणती असा संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे कट्टर शिवसैनिक असल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे. याशिवाय हे लोक मूळ शिवसेना आहेत. कृपाशंकर सिंह म्हणाले की, सध्या शिवसेनेत कट्टर शिवसैनिक आणि सॉफ्टकोअर शिवसैनिक यांच्यात लढत आहे. सध्या पक्षाचे बहुतांश आमदार आपल्यासोबत असून बहुतांश कार्यकर्तेही सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या तर्काने शिंदे म्हणतात की, ते हिंदुत्वासाठी लढत आहेत आणि म्हणून ते मूळ शिवसेना आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जायचे आहे.
भाजपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसोबत
भापजचे मुंबईतील उत्‍तर भारतीय नेते मोहित कंबोज हे नुकतेच सुरत विमानतळावर दाखल झाले आहेत. सर्व बंडखोर आमदारांसोबत जपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे दिसले आहेत. त्‍यामुळे या सर्व बंडाळीच्‍या मागे भाजपचा हात असल्‍याचे बोलल्‍या जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!