संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –‘ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची प्रारूप अधिसूचना रोजी २ जून रोजी प्रसिध्द होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.
प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांच्या काही हरकती व सूचना असल्यास त्यांनी ८ जून २०२२ पर्यंत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांचे कडे सादर करावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.