संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
उत्तराखंड – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी १० मार्च रोजी मंत्रीपदाची शपथ घेत कारभार हाती घेतला होता. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे तीरथ सिंह रावत हे नेहमी चर्चेत होते. शुक्रवारी उशीरा रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी मौर्या याच्याकडे सोपवला आहे. आज शुक्रवारी दुपारीच रावत यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून राजीनामा दिला असल्याच्या चर्चा होत्या तसेच भेटून चर्चा केली असल्याचे समजते आहे. तीरथ सिंह रावत मागील ३ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते शुक्रवारी उशीरा रात्री देहरादूनला दाखल झाले.
तीरथ सिंह रावत देहरादूनवरुन थेट राजभवनावर जाऊन राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. उत्तरा खंडसाठी नवा नेता आणि मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजप विधीमंडळाची बैठक शनिवारी दुपारी ३ वाजता बोलवण्यात आली आहे. या बैठकीत आमदारांमधून नवीन मुख्यमंत्री पदासाठीचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे.
तीरथ सिंह रावत यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांना ६ महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित असते. परंतु कलम १५१ प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास १ वर्षाचा कालावधी आहे. यामुळे पोटनिवडणूका घेता येणार नाहीत. राज्यात संवैधानिक संकट तयार झाल्यामुळे राजीनामा देत असल्याचे तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.
राज्यात संवैधानित संकट तयार झाल्यामुळे तीरथ सिंह रावत यांनी २ जुलै शुक्रवारी उशीरा रात्री ११.१५ वाजता राजभवन येथे जाऊन राज्यपाल बेबी मौर्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तीरथ सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आता उत्तराखंडमधील धन सिंह रावत, सतपाल महाराज आणि पुष्कर धामी हे ३ जण आहे. यामुळे शनिवारी यांच्यातील एका नवावार शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.