इतर महामंडळांप्रमाणे एसटी मंडळाला देखील सातवा वेतन आयोग लागू करावा : बाळा नांदगावकर

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Mumbai
-राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत चर्चा झाली. राज ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या भेटील राज ठाकरे आणि शदर पवार यांच्यात काय चर्चा झाल्या याकडे सर्वांचे लक्ष होते. जवळपास एक तासाच्या चर्चेनंतर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी याविषयीची माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवारांच्या कानावर घालते आणि आणि इतर महामंडळांप्रमाणे एसटी मंडळाला देखील सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केल्याचे, बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

राज ठाकरेंची शरद पवारांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्रक्रिया झाल्यामुळे राज ठाकरे शरद पवारांना भेटले. हा फायनान्सचा विषय असल्याने शरद पवारांची भेट घेतली. ते यावर योग्य मार्ग काढतील असा विश्वास आहे. सातवा वेतन लागू केल्यास एसटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ होईल आणि ते संप मागे घेतील. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

पुढे नांदगावकर म्हणाले, दरवेळी लोक शिवतीर्थावर येऊन राज ठाकरेंचीच भेट का घेतात? कारण राज ठाकरे त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरवठा करतात. एसटी कर्मचाऱ्यांचा विषयी फार गंभीर असल्याने त्यांनी तात्काळ शरद पवारांची भेट घेतली. एसटी कर्मचारी करत असलेल्या आत्महत्या थांबाव्यात आणि आर्थिक विवंचनेत अडकलेला एसटी कर्मचारी बाहेर पडावा अशी आमची इच्छा आहे. कर्मचाऱ्यांची मागणी शरद पवारांनी एकून घेतली आणि त्याला पवारांनी सकारात्मकता दाखवली.

एसटी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या होत्या. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज ठाकरेंनी मध्यस्थी करावी अशी विनंती करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरेंनी मी या प्रकरणात मध्यस्थी करेन मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याने आत्महत्या करू नका असे आवाहन केले होते. त्वरित दुसऱ्या दिवशीच राज ठाकरेंनी या संदर्भात शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीत सकारात्मक चर्चा माहिती समोर येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!