इंडिया आघाडीचे सरकार आल्यास संपूर्ण आरक्षण हिसकावून मुसलमांनाना देणार ः पंतप्रधान मोदी

इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट ठरली आहे ; नगरला महायुतीचे उमेदवार सुजय विखे पा., सदाशिव लोंखडे यांची प्रचार सभा 

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास काँग्रेस मुसलमानांना आरक्षण देणार आहे. चारा घोटाळ्यातील आरोपी आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते लालूप्रसाद यादव यांनी सांगितले. याचा अर्थ संपूर्ण आरक्षण कोणाकडे आहे, तर एससी, एसटी, ओबीसी, गरीब यांच्याकडे आहे. आता ते म्हणतात की संपूर्ण आरक्षण हिसकावून मुसलमानांना देणार आहेत. आपल्या वोट बँकसाठी ते हे काम करणार आहे. जे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी रोखले होते, तेच पाप काँग्रेस आणि आघाडीतील पक्ष करणार आहेत, असे पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी म्हणून, त्यांनी इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट ठरली आहे, असा दावा ही यावेळी केला.
अहिल्यानगर (अहमदनगर) येथे मंगळवारी (दि.7 मे) महायुतीचे दक्षिण अहमदनगर भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पा. व शिर्डी लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी प्रचारसभेत ते बोलत होते.
दरम्यान पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. व डॉ.सुजय विखे पा. यांनी पगडी घालून घोेंगडी, काठी व राणी अहिल्याबाईची मूर्ती देऊन सत्कार केला. तसेच शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोेंखडे यांनी सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, राजेेंद्र भुसे, माजीमंत्री प्रा.राम शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष तथा माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष भालसिंग, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकटे, जि.प.मा.अध्यक्षा शालिनीताई विखे पा.,श्रीमती नागवडे, माजीमहापौर बाबासाहेब वाकळे, प्रा.बाळासाहेब बेरड आदिंसह महायुतीच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ते पुढे म्हणाले की, आज तिसर्‍या टप्प्याचे मतदान सुरू आहे. सगळीकडे भाजपा आणि एनडीएला भरपूर पाठिंबा मिळत आहे. तिसर्‍या टप्प्यातील मतदानाने हे स्पष्ट केले आहे की, 4 जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार आहे. 4 जूननंतर इंडिया आघाडीला त्यांचा झेंडा उचलणाराही कोणी नाही मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, 4 जूननंतर ही इंडिया आघाडी पूर्णतः कोसळणार आहे. यावेळेचे मतदान संतुष्टीकरण विरोधात तुष्टीकरण असे आहे. भाजपा आणि एनडीएचा प्रयत्न हा देशातील लोकांना संतुष्ट करण्याचा आहे. पण इंडियावाले वेगवेगळे कट रचून व्होट बँकेच्या तुष्टीकरणाचे काम करत आहेत. काँग्रेसने तर आपला जाहीरनामा हा मुस्लीम लीगनुसार तयार केला आहे, असा आरोपही यावेळी पंतप्रधान मोदींकडून करण्यात आला आहे. विकास, गरीबांचे कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभीमान हे भाजपाचे आणि एनडीएचे मुद्दे आहेत. पण काँग्रेस या कोणत्याही मुद्द्यावर बोललायला तयार नाही, ते गरीबांचे कल्याण या मुद्द्यावर का बोलत नाहीत, असा प्रश्न यावेळी पंतप्रधान मोदींकडून उपस्थित करण्यात आला.
या दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा., माजीमंत्री प्रा. राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार सग्राम जगताप, श्रीमती नागवडे आदिंसह मान्यवरांची भाषणे झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!