👉कर्जत- जामखेड मतदार संघाचे आ.रोहित पवार यांनी शहरात सुरू असलेल्या विकास कामांची घेतली माहिती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – आमदार रोहित पवार यांनी आज अहमदनगर महानगरपालिकेला सदिच्छा भेट देऊन नगर दर्शनाची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली इच्छा व्यक्त केली.
नगर शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक,धार्मिकतेचा परंपरा लाभलेला आहे नगर शहरात अनेक पुरातन वास्तू मोठ्या दिमाखात उभे आहे यामध्ये भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, मेमोरियल चर्च, ह्युम मेमोरिअल, मेहराबाबा तसेच शहरातील धार्मिक स्थळे आधी सर्व ऐतिहासिक ठिकाणांची मला पाहणी करायची आहे अशी इच्छा आमदार रोहित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे महापालिकेला सदिच्छा भेट दिली असता व्यक्त केली. यावेळी महापालिकेच्या कामकाजाची पाहणी करत माहिती घेतली व शहरात सुरू असलेल्या स्मार्ट एलईडी पथदिव्यांच्या योजनेचे त्यांनी कौतुक केले यावेळी आ. संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे मा.विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे,संजय चोपडा, निखिल वारे,अमोल गाडे,संतोष भोसले,नगरसेवक समद खान, आरिफ शेख,निखिल वारे, मनपा उपायुक्त यशवंत डांगे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.