… ‘आमचा वारसा’ अभियान राबवून कार्यकर्त्यांची नाराजी व भावना भाजपातच राहून व्यक्त करण्याचा निर्धार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी -:
भाजप च्या अंतर्गत राजकारणात पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत असल्याने अस्वस्थ झालेल्या तालुक्यातील मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे या मास लिडर आहेत… त्यांना जाणीवपूर्वक राज्य भाजापकडून अपमानीत केले जात आहे. त्यामुळे त्यांचे मागे उभी असलेली महाराष्ट्रातील ताकद राष्ट्रीय भाजपाला दाखवण्या करीता पंकजाताई .. आमच्या आशा… आमचा वारसा हे अभियान राबवून कार्यकर्त्यांची नाराजी व भावना भाजपातच राहून व्यक्त करण्याचा निर्धार केला आहे.


त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाला दहा लाख ईमेल व एक लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही मोहीम राज्यात मुंडेंचा व ओबीसी मतदारांचा प्रभाव असलेल्या 78 मतदारसंघातून संयुक्तरित्या राबवली जाणार आहे. या मोहीमेसााठी भगवानगडाच्या पायथ्याला असलेल्या अकोला पंचायत समिती गणाचे माजी सदस्य सुभाष केकाण व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला आहे.
या संर्दभात बोलताना सुभाष केकाण म्हणाले कि मुंडे चा प्रभाव हा राज्यातील बीड जिल्हा तसेच येवला,सिन्नर, सिंदखेड राजा, बुलढाणा, खामगांव-शेगांव रिसोड, मालेगांव, वाशीम, अहमदपुर, लातुर, येवला, इगतपुरी या सह नााशीक पटयातील बहुतांशी मतदार संघ, अ.नगर मधील पाथर्डी, जामखेड, राहुरी, कर्जत,नेवासा, हिंगोली, गंगाखेड, कळमनुरी, जिंतुर, सेलू, मानवत, वसमत, अशा एकूण 78 मतदारसंघात आहे. त्यामुळेच प्रत्येक विधानसभा निवडणूकीत गोपीनाथ मुंडे साहेबांची व त्यानंतर पंकजा मुंडेंची प्रचार सभा ठरलेली असते. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे उभेदवार घोषीत असतांनाही पंकजा मुंडे यांनी संघर्षयात्रा काढल्या. त्यातूनच महाराष्ट्रात सेना- भाजपाची सत्ता आली. यावेळी कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली अशा घोषणा दिल्या गेल्या. पंकजा या मंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील जनता देखील त्यांना पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहू लागले. त्यामुळेच पक्षातंर्गत फडणवीसांचा सुप्त विरोध सुरु झाला. त्यांना डावलण्याचे काम सुरु झाले. जलसंधारण खात्याच्या माध्यमातून अंत्यत भरीव असे ग्रामीण भागात काम करुन त्यांचा ठसा उमटवला असतांनाही त्यांच्याकडील जलसंधारण खाते काढून ते राम शिंदे यांना जाणीवपूर्वक देण्यात आले, विधानसभेला धनंजय मुंडे यांना पडद्याआड ताकद देण्यात आली.
दि. 20 रोजी होवू घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत मास लिडर असलेल्या पंकजा मुंडे यांना डावलून एक वर्ष फडणवीस यांचे स्वियसहायक असलेल्या श्रीकांत भारती व ओबीसीचा चेहरा बनू इच्छीत असलेल्या राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात येवून पंकजा मुंडे समर्थकांची अडचण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
स्व. मुंडे यांचे कार्यकर्ते असलेल्यांना पंकजा मुंडेंना यांना विश्वासात न घेता केंद्रात मंत्रीपद देवून पंकजा मुंडेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुुरु आहे. फडणवीस यांना मुंडे या डोईजड होत चालल्याने त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याने ओबीसी ना आज राज्यात नेता राहिला नाही. राज्यात मुंडे यांची काय ताकद आहे ते दाखवण्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार घेत केंद्रीय नेत्यांना आम्ही नाराज आहोत… आमचे गांव… तालुका नाराज आहे. महाराष्ट्र भाजपा नाराज आहे… पंकजाताईंना न्याय द्या… अशा आशयाचे १० लाख ईमेल केले जाणार असून १ लाख पोस्टकार्ड पाठवले जाणार आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे श्रध्दास्थान असलेल्या भगवान गडामुळे पाथर्डी तालुका हा राजकारण समाजकारण, धर्मकारणाचा केंद्रबिंदू राहीला आहे. याच ठिकाणावरुन पुन्हा भाजपातंर्गत संघर्षाला सामोरे जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला आहे.पंकजा मुंडेंना समर्थन देणेकरीता सुरु होणार्‍या , पंकजाताई … आमची आाशा… आमचा वारसा या मोहीमेमध्ये ज्या मतदारसंघात मुंडे यांचा प्रभाव आहे त्या मतदारसंघात भाजप चे नेते आले तर त्यांना उघडपणे जाब विचारला जाणार आहे. नेत्यांच्या कपटनीतीला उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज झाले असून भाजपातच राहायचे, कोणत्याही पदाची किंवा उमेदवारीची अपेक्षा आमची नाही. पंकजा नाही तर भाजप नाही अशी आमची भूमिका असल्याचे शेवटी केकाण यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!