संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत :-आंबी जळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ.स्वाती लोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिलेला शब्द पाळत सरपंच निकत यांनी लोंढे यांना दिलेल्या संधी मुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच विलास निकत यांच्या अध्यक्षते खाली बैठक झाली यावेळी उपसरपंच संजना तुकाराम मोरे, ग्रामपंचायतचे सदस्या सौ. अनिता सुरेश यादव, सौ लतिफा बाबूलाल शेख, सुभाष नामदेव अनारसे, तसेच श्यामराव सर्जेराव निकत, माजी सरपंच बाळासाहेब लोंढे, माणिक लोंढे, मुरलीधर लोंढे, नामदेव शिंदे, मोहन नाना निकत, राजेंद्र शिंदे, लक्ष्मण आबा निकत, बाबा मेजर, श्रिराम गायकवाड, किसन दादा निकत, बाबूलाल शेख, सुरेश यादव, गावातील ग्रामस्थ व ग्रामसेवक आजबे भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब धांडे यांचे नाव सह नामदेव यादव, मच्छिंद्र लोंढे, रवी लोंढे, यांच्या उपस्थितीत सौ.स्वाती युवराज लोंढे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
आंबीजळगावचे विद्यमान सरपंच विलास आप्पा निकत यांनी दिलेला शब्द पाळला, माघार न घेता बोले तैसा चाले या ऊक्तीप्रमाणे मातंग समाजाच्या महिला भगिनी स्वाती लोंढे यांना उपसरपंच पद देण्यात आले, गावातील राजकीय कुरघोड्या करणाऱ्यांनी वरिष्ठ पदाधिकारी अधिकारी यांच्या माध्यमातून निकत यांच्यावर खोटे नाटे व नको ते अरोप करून गावात ते कसे बदनाम होतील व त्याच्या मागे असलेले जनमत कसे तुटेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले, सरपंच निकत यांनी ग्रामस्थाना दिलेला शब्द तर ते पाळलाच पण जी कामे इतराना पाच वर्षात जमली नाहीत तर ती म्हणजे कामे एका वर्षात केल्यामुळे विरोधकाना चांगलले काम खपले नाही म्हणून त्यांनी निकत यांचे वर बालंट.आणले मात्र या त्यातून त्यांनी तावून सुलाखून पुन्हा जोमाने कामाला लागले सुरुवात केली केली आहे, यामुळे विरोधकांना जोरदार चपराक बसली होती आहे. या निवडी नंतर मातंग एकताचे जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले.
संकलन : आशिष बोरा