संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
👉अहमदनगर जिल्हयातील 192 ग्रामपंचायती मधील 274 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूका 21 डिसेंबर रोजी मतदान व 22 डिसेंबर ला निकाल*
अहमदनगर –निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी राज्यातील 4554 ग्रामपंचायतीमधील 7130 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदार घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हयातील 192 ग्रामपंचायती मधील 274 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देणारे परिपत्रक अहमदनगरचे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पाठविले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तारीख निहाय निवडणूक कार्यक्रम घेण्यात यावा. अशा सूचना या परिपत्रकांत देण्यात आल्या आहेत. या निवडणुकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 9 डिसेंबर 2021 उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. तर अंतिम मतदार यादी 18 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द केली आहे. सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर 2021 परिपत्रकातील सूचनांचे तंतोतत पालन करून सदर पोटनिवडणूकांचा कार्यक्रम राबवावा. तसेच राज्य शासनाने दिलेल्या कोरोना नियमावलीचे ही पालन करण्यात यावे. अशा सूचना राज्य् निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी परिपत्रकात नमूद केल्या आहेत.