अ.नगरात 25 तर शिर्डी मतदारसंघात 20 उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहमदनगर लोकसभा मतदारासंघासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकूण 25 जण असून, यापैकी11 जण अपक्ष उमेदवार आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात 13 जणांनी अपक्ष उमेदवार आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारासंघासाठी प्राप्त 42 उमेदवारांचे 55 उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दि.29 एप्रिल 2024 दुपारी 3 वाजेपयर्र्ंत 11 उमेदवारांनी आपली मागे घेतल्याबाबतची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी 37 अहमदनगर यांना सादर केल्याने 25 उमेदवार हे निवडणूक लढविण्यासाठी अंतिम करण्यात येऊन त्यांना दुपारी 3 नंतर लगेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक लढविणार्‍या 25 उमेदवार यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार याप्रमाणे डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पा. (भाजपा), निलेश ज्ञानदेव लंके(नॅशनॅलिटी कॉँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), उमाशंकर श्यामबाबू यादव (बहुजन समाज पार्टी), आरती किशोरकुमार हालदार (प्रबु्द्ध रिपब्लिकन पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना – पक्ष), डॉ.कैलास निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), रविंद्र लिलाचंद कोठारी (राष्ट्रीय जनमच-सेक्युलर), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), दिलीप कोेंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी), भागवत धोेंडीबा गायकवाड (समता पार्टी), मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी), भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), अपक्ष – अमोल विलास पाचुंदकर, मच्छिंद्र राधाकिसन गावडे, गोरख दशरथ आळेकर, गंगाधर हरिभाऊ कोळेकर, नवशाद मुन्सीलाल शेख, प्रविण सुभाष दळवी, बिलाल गफूर शेख, महेेंद्र दादासाहेब शिंदे, अ‍ॅड .मोहंमद जमीर शेख, अनिल गणपत शेकटकर, सुर्यभान दत्तात्रय लांबे

38 शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 31 उमेदवारांचे 40 उमेदवारी अर्ज दि.25 एप्रिल 2024 पयर्र्ंत या शेवटच्या तारखेपयर्र्ंत प्राप्त झाले होेते. दि.26 एप्रिल 2024 रोजी झालेल्या छाननीत 22 उमेदवार वैधरित्या उमेदवार जाहीर करण्यात आले. दि.29 एप्रिल 2024 ला दुपारी 3 वाजेपयर्र्ंत दोघा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याबाबतची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर केल्याने 20 उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी अंतिम करण्यात येऊन त्यांना दुपारी 3 वाजेनंतर लगेच निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक लढविणार्‍या 20 उमेदवारांची यादी निवडणूक अधिकार्‍याने जाहीर केली. ते उमेदवार याप्रमाणे ः भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे), सदाशिव किसन लोेंखडे (शिवसेना), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), उत्कर्षा प्रेमानंद रुपवते (वंचित बहुजन आघाडी), राजेेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), अपक्ष – गोरक्ष तान्हाजी बागुल, अ‍ॅड. सिद्धार्थ दीपक बोधक, अशोक रामचंद्र आल्हाट, सतिष भिवा पवार, संजय पोपट भालेराव, गंगाधर राजाराम कदम, भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे, प्रशांत वसंत निकम, नचिकेत रघुनाथ खरात, रविंद्र कलय्या स्वामी, चंद्रकांत संभाजी दोेंदे, अभिजीत अशोकराव पोटे, विजयकुमार गोविंदराव खाजेकर आदि.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!