अहमदनगर शहरात रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागाचा छापा ; 37 घरगुती वापराच्या गॅस टाक्या जप्त

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
शहरातील नालेगांव अमरधाम शेजारी असलेल्या ठिकाणी विनापरवानगी व अवैधरित्या घरगुती गॅसटाक्यातून रिक्षामध्ये गॅस मशिनच्या साहायाने भरत असतांना जिल्हा पुरवठा विभागाच्या  पथकाने पकडले. या छाप्यामध्ये भारत गॅस कंपनीच्या रिकाम्या 18 व भरलेल्या 19 अशा एकूण 37 घरगुती वापराच्या गॅस टाक्या व दोन इलेक्ट्रीक वजन काटे जप्त करण्यात आला आहे. निलेश गोविंद आरडे व विकास नारायण खोसे यांच्या  विरुध्द जिवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वेय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, अन्न धान्य वितरण अधिकारी अर्चना पागिरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी क्रं. 3 राजेंद्र राउत, पुरवठा निरीक्षक सावेडी निशा पाईकराव पुरवठा निरीक्षक, भिंगार जयंत भिंगारदिवे, पुरवठा निरीक्षक, नगर तालुका महादेव कुंभार आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, अन्न धान्य वितरण कार्यालय पुरवठा निरीक्षक जयंत कान्हू भिंगारदिवे यांना प्राधिकृत केलेनुसार पोलीस ठाण्यात येथे हजर होऊन सरकारतर्फे फिर्याद दिली.  फिर्यादीत दि. 16 नोव्हेंबरला जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे नालेगांव अमरधाम शेजारी असलेल्या ठिकाणी विनापरवानगी व अवैधरित्या घरगुती गॅसटाक्यातून रिक्षा या वाहनांमध्ये गॅस मशिनचे साहायाने भरत असतांना पथकास आढळून आले. सकाळी 11. 45 वाजता छापा टाकला असता, तेथे निलेश गोविंद आरडे (रा. गरवारे चौक, एम.आय.डी.सी. अ नगर) व विकास नारायण खोसे यांनी ठिकाणी दोन बंद असलेल्या रिक्षा (क्र.एच.एच. 16 ए.जी. 8776) मध्ये 1.5 एचपी प्रेशर पंप मोटार च्या साह्याने आणि (एम. एच. 17 टी 5345) रिक्षामध्ये वन फेज इंडक्शन मोटर मॅक्सवेल कंपनीच्या मोटार पंपच्या साह्याने गॅस रिफीलींग घरगुती वापराच्या टाक्याधून गॅस काढून अवैधरित्या रिक्षामध्ये भरतांना आढळून आले तेथे गॅस भरणे करीता रिक्षा (क्र. एचएच 12 एच सी 4006) रिक्षा चालक अफरोज शेख, (रा.काटवन खंडोबा ) जबाब घेतला आहे. ( एचएच 16 एम 6650) राजु औशिकर (रा.भुषणनगर केडगांव), जबाब घेतला. रिक्षा (क्र. एमएच 16 सीई 7364) गणेश औशिकर (रा. रेल्वे स्टेशन नगर), जबाब घेतला आहे. रिक्षा (क्र. एचएच 16 बी. 6821) पळून गेला. रिक्षा (क्र. एमएच 16 बी. 7156) पळून गेला. या ठिकाणी भारत गॅस कंपनीच्या रिकाम्या 18 व भरलेल्या 19 अशा एकूण 37 घरगुती वापराच्या गॅस टाक्या व दोन इलेक्ट्रीक वजन काटे आढळून आल्या. त्यांचा पंचनामा पंचासमक्ष व पथकासमक्ष केला आहे. चौकशी दरम्यान भारत गॅस कंपनीचे गॅस सिलेंडर हे आनंद गॅस एजन्सी व कराचीवाला गैस एजन्सी च्या डिलीवरी मार्फत प्राप्त झाल्याचे जबाबात म्हटले  आहे.
बेकायदेशिररित्या विनापरवानगी अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधून गॅस रिफीलींग करुन मशिनद्वारे रिक्षा या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचे निदर्शनास आल्याने  निलेश गोविंद आरडे (रा. गरवारे चौक, एमआयडीसी अ.नगर) व विकास नारायण खोसे (रा. एमआयडीसी अ.नगर) यांनी Liquified Petrolium Gas (Regulation of supply and Distribution order 2000 मधील नियमांचा भंग केला आहे.  सदर व्यक्तींनी बेकायदेशिररित्या संगनमत करुन घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस रिक्षामध्ये ट्रान्सफर करून मानवी जीवन धोक्यात येईल, व्यक्तीला धोक अगर नुकसान पोहोचेल अशा प्रकारे ज्वालाग्राही पदार्थ सुरक्षिततेची काळजी न घेता विनापरवाना विक्रीसाठी जवळ बाळगला आणि त्याची बेकायदेशिरपणे विक्री करत होता. म्हणून  निलेश गोविंद आरडे व विकास नारायण खोसे यांच्या  विरुध्द जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 मधील कलम 37 व 8 मधील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 285,286,34,336 मधील तरतुर्दीचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!