संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- माझी वसुंधरा 2.0 अमृत गटामध्ये अहमदनगर महानगरपालिका राज्यात अव्वल ठरली. या निमित्ताने माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवार (दि.५) मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व राजशिष्ठाचारमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर महानगरपालिकेला सन्मानित करण्यात आले.
यावेळी अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रोहिणीताई संजय शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई बोरुडे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्य स्वच्छता निरिक्षक श्री बिडकर व श्री. सारसर प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान यांनी शहरवासियांच्या वतीने सन्मानपत्र स्विकारले.