अहमदनगर महानगरपालिकेचा ‘एकल वापर प्लास्टीक मुक्तीचा प्लास्टीक’ विक्रेत्यांच्या बैठकीत संकल्प

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर -:
महानगरपालिका सभागृहामध्ये महानगरपालिका हद्दीतील सर्व प्लास्टीक उत्पादक, होलसेल विक्रेते, कापडबाजार व्यापारी असोसिएशन, हातगाडी व्यापारी असोसिएशन, चौपाटी व्यापारी असोसिएशन यांची नुकतीच प्लास्टीक बंदीबाबत बैठक पार पडली.


या बैठकीमध्ये जमलेल्या व्यापारी, किरकोळ विक्रेते व इतर व्यावसायिकांसोबत चर्चा करुन सदर चर्चेमध्ये दि.६ जुलै २०२२ पर्यंत त्यांच्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टीकच्या साठ्याबाबत महापालिकेस लिखित स्वरुपात माहिती देण्यास सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जे आवश्यक आहे अशी माहिती लिखीत स्वरुपात महापालिकेस देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच शहरात सिंगल युज प्लास्टीकचे (SUP) उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणि वापरावर बंदी असून अ) प्लास्टीकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टीकच्या कांडया, प्लास्टीकचे झेंडे, केंडी, कांडया, आईस्क्रीम कांडया. ब) सजावटीसाठी प्लास्टीक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल ). क) प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी, जसे काटे, चमचे चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकीटाभोवती प्लास्टीक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, प्लास्टीकच्या पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा कमी) यावर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याबरोबरच महाराष्ट्र प्लास्टीक व थर्माकोल अधिसुचना २०१८ अंतर्गत खालील अतिरिक्त एकल वापर प्लास्टीकचा वापर मार्च २०१८ पासूनच प्रतिबंधीत असून त्यातील सर्व प्रकारच्या प्लास्टीकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) हँडल असलेल्या व नसलेल्या. कंपोस्टेबल प्लास्टीक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या नॉन ओव्हन बॅग्स (पॉलीप्रोपिलीन पासून बनविलेले) ३. एकल वापर प्लास्टीकचे उत्पादन डिश, बाउल, कंन्टेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगकरिता) यावर बंदी घालण्यात आल्याचा पुर्नउच्चार करण्यात आला.
या सुचनेद्वारे अहमदनगर शहरातील सर्व उत्पादक, साठवणूकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यवसायीक आस्थापना (मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र, सिनेमा केंद्र, पर्यटन ठिकाण, शाळा महाविदयालय, कार्यालयीन इमारती, रुग्णालय व खाजगी संस्था तथा सामान्य नागरिकांना वरील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
तद्नंतर पुढील महिन्यापासून ७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टीकचा वापर करत असलेल्या व्यापारी, दुकानदार, विक्रेते, वापरकर्ते यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
बैठकीत महापालिका उपायुक्त यशवंत डांगे यांनी व्यापारी, दुकानदार, व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेत शहर एकल वापर प्लास्टीक मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.
बैठकीस घनकचरा विभाग प्रमुख डॉ. शंकर शेडाळे, मुख्य स्वच्छता निरिक्षक के. के. देशमुख व परिक्षित बिडकर तसेच नगर शहरातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, होलसेल विक्रेते, व्यापारी असोसिएशनचे सभासद हजर होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!