अहमदनगर – परळी मार्गावर रेल्वेगाडीला भीषण आग

अहमदनगर – परळी मार्गावर रेल्वेगाडीला भीषण आग

https://youtu.be/Ce6R6iKbFvc?si=xYQlnW8c39r07PLN

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी सोमवारी (दि.१६) दुपारी रेल्वेगाडीला भीषण आग लागून गाडीचे ६ डबे भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. रेल्वेगाडीत अवघे ३-४ प्रवासी होते, त्यांनी पटापट खाली उड्या टाकल्याने कुठलीही जिवित हानी सुदैवाने झाली नाही. मात्र या दुर्घटनेत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर रेल्वेची वाहतूक सुरू झालेली आहे. सोमवारी दुपारी आष्टीकडून नगरकडे येत असलेली रेल्वेगाडी नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी आली. तेथे गाडी थांबल्यावर अचानक इंजिनच्या पाठीमागील डब्याला भीषण आग लागली. ही आग नंतर पसरत जावून ६ डबे पेटले. गाडी उभी असताना आग लागल्याचे लक्षात आल्यावर गाडीत असलेले ३-४ प्रवासी तसेच इंजिन मध्ये असलेले चालक व इतर रेल्वे कर्मचारी यांनी पटापट गाडीच्या खाली उड्या घेतल्या. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!