अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कार्यकर्ता बैठकी

उद्धव ठाकरे यांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी मोठे संघटन उभे करणार : मुकुंद सिनगर
संजय महाजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी
: शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून मोठे संघटन उभे करणार असून गावागावात जाऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेण्याच्या सूचना राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर यांनी तीन दिवशीय नगर जिल्हा दौऱ्यात सात तालुक्यातील “कक्ष कार्यकर्ता बैठकी”त आपल्या पदाधिकारी यांना दिल्या आहेत.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष,शिवसेनेचे सचिव मा.खा. अनिल भाऊ देसाई यांच्या सुचनेनुसार उपाध्यक्ष राजू पाटील आणि सरचिटणीस विजय मालणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर यांनी नुकताच उत्तर महाराष्ट्रातील “जिल्हा दौरा” सुरु केला आहे. यातील पहिल्या टप्प्यात दिनांक १४, १५ व १६ जुलै रोजी नगर जिल्ह्यातील ७ तालुक्यांत सलग कक्ष कार्यकर्ता बैठका घेऊन आपल्या पदाधिकारी यांना “शिवसेनेशी निष्ठा आणि कक्षाची शिस्त” यावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. या संपूर्ण तीन दिवशीय दौऱ्यात नगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक अशोक मामा थोरे, सहजिल्हा संघटक दत्तात्रय कडू व प्रमोद कुलट, उपजिल्हा संघटक अशोक पवार, काळू हाटकर व मिलिंद नाईकवाडी समवेत होते. प्रत्येक तालुक्यातील कक्ष तालुका संघटक व शहर संघटक यांनी उत्तम नियोजन करत अत्यंत उत्साहात सर्व बैठका पार पडल्या असून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या बैठकीतून आपल्या पदाधिकारी यांना सक्षम कार्यकर्ता तयार करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले असून यापुढील तीन महिन्याच्या आत जिल्ह्यात मोठे संघटन उभे करून आमचे मार्गदर्शक मा.खा.अनिल भाऊ देसाई यांची अधिकृत वेळ घेऊन १०० पेक्षा जास्त डिजिटल शाखांचे एकाच वेळी अनावरण केले जाणार असल्याची माहिती मुकुंद सिनगर यांनी दिली. यामुळे फसवणूक होणाऱ्या ग्राहकाला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अधिकृत कार्यालय उपलब्ध होणार असून त्यांना प्रत्येक वेळी तालुक्याला येण्याची गरज भासणार नाही.
यावेळी ठिकठिकाणी तालुक्यातील अनेक शेतकरी, छोटे व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक, नोकरदार, दुकानदार यांनी व्यासपीठावर येऊन आपापल्या व्यथा मांडल्या. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे एक मोठे व्यासपीठ मिळाल्याने समाधान व्यक्त करत यापुढे आम्हाला न्याय मिळवून देणाऱ्या फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. सध्या शिवसेना हा एकमेव पक्ष जनतेत उतरून त्यांचे प्रश्न समजून घेत असून फक्त आपलेच शिवसैनिक आम्हाला धीर देत आहेत मात्र बाकीच्यांना नुसती सत्ता हवी आहे, अशा तीव्र शब्दात अनेकांनी संताप व्यक्त करत महाराष्ट्रात परत एकदा ठाकरे सरकार आल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही, अशी स्पष्ट भावना सिनगर यांच्यासमोर व्यक्त केली. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट असून नेवासा तालुक्यात तर शासनाने दिलेले सोयाबीन ६१२ हे वान उतरले नसल्याने शेतकऱ्यांनी तक्रार दिली मात्र कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्यास वेळ नाही, अशी सरकारची परिस्थिती आहे. यावेळी श्री.सिनगर यांनी संबंधित कृषी अधिकारी यांना फोन करून लक्ष घालण्याच्या सूचना केल्यात आणि तात्काळ जिल्हा कृषी अधिक्षक यांना पत्रव्यवहार करून मदत मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत विनंती केली आहे. म्हणूनच सामान्य जनतेत शिवसेनेबद्दल प्रचंड आदर असून यापुढे कार्यकर्त्यांनी अधिक सजग राहून जनतेत मिसळत राहण्याच्या सूचना जिल्हा पदाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रत्येक तालुका स्तरावर कक्ष तालुका संघटक अनुक्रमे, रिंकेश जाधव (राहाता); अमोल शिंदे (कोपरगाव); श्रीकांत शेळके (श्रीरामपूर); जयराम कदम (नेवासा); कृष्णा पोपळघट (राहुरी); सदाशिव हासे (संगमनेर); लक्ष्मण शेळके (अकोले); कक्ष तालुका सह संघटक अनुक्रमे, रोहित पवार (कोपरगाव); अमित कोलते (श्रीरामपूर); आदिनाथ फाटके (नेवासा); राजेंद्र म्हसे (राहुरी); गणेश सातपुते (राहाता); प्रविण कडलग (संगमनेर); संतोष शेटे (अकोले); कक्ष शहर संघटक अनुक्रमे, रविंद्र सोनवणे (राहाता); रविंद्र कथले (कोपरगाव); जगदीश बिरारी (श्रीरामपूर); कैलास जिरे (नेवासा); योगेश घाडगे (राहुरी); योगेश बिचकर (संगमनेर); विक्रम मालुंजकर (अकोले) आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन तालुका संघटक यांनी तर शहर संघटक यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!