अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक प्रणाली लावा : सीओ येरेकर

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक प्रणाली लावा : सीओ येरेकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक , ग्राम विकास आधिकारी व कर्मचाऱ्यांची दैनिक हजेरी बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातुनच घेण्यात यावी , असे आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व गट विकास अधिका-यांना काढले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी यापूर्वीच सर्वच ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवावी,अशी तक्रार दाखल केली होती . त्यावर सर्व गट विकास अधिका-यांनी ग्रामपंचायतींना पत्राद्वारे बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यासंदर्भात कार्यवाही अहवाल सादर करण्याचे सांगितले होते.मात्र यावर अनेक ग्रामपंचायतींनी बायोमेट्रिक प्रणाली बसवली नसून ग्रामसेवकांनी बीडीओ यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती .
मात्र दिपक पाचपुते यांनी आयुक्त पातळीवर पाठपुरावा करुन तसे आदेश काढण्यास भाग पाडले . त्यावरुन सीओ आशिष येरेकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविणेबाबत नुकतेच आदेश काढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास पुढिल आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे सोपान रावडे ( नेवासा ) व दीपक पाचपुते ( नगर ) यांनी इशारा दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!