अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सह.पतसंस्थेच्यावतीने अभिवादन
शहाजी राजांचा थोर पराक्रम हा कायम प्रेरणादायी- उदय अनभुले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – अहमदनगरच्या इतिहासातील भातोडी पारगांव येथील विजापुर सैन्याचा पराभव केला. या लढाईने मराठा शक्तीच्या उदयाचे संकेत देणारी शुभ शगुन होता. त्या लढाईचे नेतृत्व शहाजी राजांनी केले होती. त्यानंतर मोठी क्रांती होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा पायाच रचला गेला. शहाजी राजें आणि नगरचे घनिष्ठ संबंध होते. त्यांचे विचार आणि कल्पक दृरदृष्टीने मराठी सम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहाजी राजांचा थोर पराक्रम हा कायम प्रेरणादायी राहिल, असे प्रतिपादन मराठा पतसंस्थेचे संचालक उदय अनभुले यांनी केले.
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक वस्तू संग्राहल येथील त्यांच्या पुतळ्यास अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सह.पतसंस्थेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक उदय अनभुले, बापूराजे भोसले, शशिकांत भांबरे, निलेश म्हसे, दत्ता साठे, श्रीपाद दगडे, हेमंत मुळे, आनंद किलोर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी शशिकांत भांबरे यांनी शहाजी राजे भोसले यांच्या पराक्रम, लढाया आणि नगर संबंधित घटना बाबत माहिती दिली. तसेच मराठा नागरी पतसंस्थेने समाजातील विविध घटकांना आर्थिक सक्षम करण्याचे काम करत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम करत असल्याचे सांगितले.
यावेळी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन बापुराजे भोसले यांनी केले तर आभार श्रीपाद दगडे यांनी मानले.